HomeArchiveआयटी आणि बँकिंग...

आयटी आणि बँकिंग स्टॉकमध्ये मोठी घसरण

Details

 
hegdekiran17@gmail.com
 
“२०२०:२०२१ या वित्तीय वर्षाच्या पहिल्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टीच्या गुंतवणुकदारांनी मोठ्या प्रमाणात विक्री केल्याने ४%च्या घसरणीसह हा दिवस नकारात्मक ठरला. आयटी आणि बँकिंग स्टॉकनी मोठी घसरण घेतल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले. टेक महिंद्रा, टीसीएस आणि माइंड ट्री या टॉप आयटी प्लेअर्समध्येही सर्वाधिक ९.५ टक्क्यांनी घट दिसून आली तर कोटक बँक (एनएसई) सुद्धा ८.८३% नी खाली आली.”
 
“कोरोना व्हायरस लॉकडाउनमुळे वाहन क्षेत्रातही तीव्र घट दिसून आल्याचे सिंह यांनी सांगितले. भारतातील सर्वात मोठी वाहन कंपनी मारूती सुझूकीने सर्वात मोठी फेब्रुवारी महिन्यातील १५८,०७६ अंकांवरून आज मार्चमध्ये ८३,७९२ अंकांवर विक्रमी रितीने घसरण केली. दुसरीकडे अशोक लेलँडची विक्री मार्च महिन्यात ९०% पेक्षा कमी अंकांनी घसरली. या निर्देशानंतर निफ्टी ऑटो इंडेक्स १.५६ टक्क्यांनी घसरला तर बीएसई ऑटो इंडेक्स १.५४ टक्क्यांनी घसरला. हिरो मोटोकॉर्प, बजाज ऑटो आणि एक्साइड इंडस्ट्रीजसह काही मोजकेच समभाग विरूद्ध दिशेने जाताना दिसले.”
 

Continue reading

इराकमधून अमेरिकेची संपूर्ण सैन्यवापसी!

अमेरिकेने इराकमधून आपले सर्व सैन्य माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला असून, ३० सप्टेंबर २०२६पर्यंत सर्व अमेरिकन सैनिक मायदेशी परततील. इराकचे पंतप्रधान मोहम्मद शिया अल-सुदानी आणि अमेरिकन सेंट्रल कमांड यांच्यात झालेल्या चर्चेनंतर या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या माघारीमुळे २००३मध्ये...

केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा रुग्णालयात दाखल

भारतीय जनता पक्षाचे (भाजप) माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्य तथा कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स (AIIMS) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काल, १३ ऑगस्टच्या सायंकाळी जे. पी. नड्डा यांना अचानक...

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...
Skip to content