Details
केएचएल न्युज ब्युरो
hegdekiran17@gmail.com
“कोरोनाचा प्रभाव वाढत असताना गेल्या आठवड्यात दोन्ही शेअर बाजारात फार्मा, एफएमसीजी आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांनी परिस्थिती तारली असे मत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी व्यक्त केले. निफ्टी फार्माने ४.७७% ची बढत घेतली तर लुपिन ही सर्वोत्कृष्ट परफॉर्मर ठरली. एनएसईमध्ये लुपिनने १४.३३%ची वृद्धी केली.”
” यूएसएफडीएने औरंगाबाद सुविधेला मंजुरी दिल्यामुळे हा परिणाम पाहायला मिळाला. तसेच सन फार्माने ९.४३% ची बढत घेतली तर टोरेंट फार्मानेदेखील ६.०२% वृद्धी दर्शवली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये दुहेरी अंकांची बढत घेणाऱ्यांमध्ये लुपिनसह मोरपेन लॅब्स, मार्कसन्स फार्मा आणि पॅनाकिया बायोटेक यांचा समावेश आहे.”

