HomeArchive'मित्रों'वर दररोज १०...

‘मित्रों’वर दररोज १० लाख नवीन व्हिडीओ!

Details

 
 
“केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
मित्रों या स्वदेशी शॉर्ट फॉर्म व्हिडिओ अॅपने गूगल स्टोअरवर २५+ डाऊलनोड्सचे यश मिळवले असून जास्तीतजास्त कंटेंट क्रिएटर्सचा ओढा हे अॅप जॉइन करण्याकडे आहे. शॉर्ट व्हिडिओ मेकिंग अॅप असलेल्या मित्रोंवर दररोज जवळपास १० लाख नवे व्हिडिओ तयार होत असून दर तासाला ४० दशलक्ष व्हिडिओ पाहिले जात आहेत.
 
एप्रिल २०२०मध्ये शिवांक अग्रवाल आणि अनिश खंडेलवाल यांनी एकत्रितरित्या लाँच केलेले मित्रों हे अॅप सुरुवातीपासूनच लोकप्रिय ठरले आहे. हलक्या-फुलक्या विनोदांचा धागा पकडत लोकांनी त्यांचे नावीन्यपूर्ण व्हिडिओ ऑनलाइन टाकावेत, जेणेकरून लोकांची डिजिटल गुंतवणूक आणि मनोरंजनाची नव्याने कल्पना केली जाईल, हाच या शॉर्ट फॉर्म व्हिडिओ अॅपच्या स्थापनेमागील उद्देश आहे.
 
मित्रोंचे संस्थापक आणि सीईओ शिवांक अग्रवाल म्हणाले की, मित्रों प्लॅटफॉर्मवर दररोज जवळपास एक दशलक्ष नवे व्हिडिओ तयार होताना पाहून आम्हाला खूप आनंद होत आहे. प्रत्येकजण लॉकडाउनमध्ये ज्यावेळी घरात राहण्यासाठी बांधील होता, तेव्हाच लोकांना असा डिजिटल एंटरटेनमेंट प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यावा, ज्यातून लोकांनी किंवा स्वत: टाकलेल्या शॉर्ट व्हिडिओद्वारे लोकांचे मनोरंजन होईल, असा आमचा उद्देश होता.
 
मित्रों विकसकांसाठी ग्राहकांची डेटा प्रायव्हसी ही प्राथमिकता आहे. हे अॅप यूझर्सना व्हिडिओ निर्मिती, संपादन आणि शेअर करण्यासाठी सोपे आणि अखंड इंटरफेस प्रदान करते. त्याचवेळेला प्लॅटफॉर्मवरील व्हिडिओची लायब्ररीदेखील उपलब्ध करून देते.
 “

Continue reading

पंतप्रधान मोदी सेशेल्सच्या सर्वोच्च बहुमानाने सन्मानित

व्हिक्टोरिया (सेशेल्स) येथे एका विशेष सोहळ्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज सेशेल्सचे अध्यक्ष डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्या हस्ते ‘गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन’ हा पहिला सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. पंतप्रधानांच्या पर्यावरणपूरक नेतृत्त्वासाठी, विकसनशील देशांच्या हितासाठी केलेले प्रयत्न, सागरी...

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...
Skip to content