HomeArchiveपेटीएम मॉलने केली...

पेटीएम मॉलने केली ‘फ्रीडम सेल’ची घोषणा!

Details
 
 

 
केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
“ऑफलाईन टू ऑनलाईन मॉडेलद्वारे भारतातील ई कॉमर्स क्षेत्राची व्याख्या बदलणाऱ्या पेटीएम मॉलने फ्रीडम सेलच्या यशस्वी लाँचिंगची घोषणा केली आहे. १७ ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या सेलचा विशेष भर एसएमई आणि मेक इन इंडिया ब्रँडवर आहे. २००पेक्षा जास्त एसएमई आणि स्टार्टअप्स २० वेगवेगळ्या प्रकारात ५००पेक्षा जास्त नवी उत्पादने लाँच करत आहेत. किराणा दुकानांसह १०,०००पेक्षा जास्त ऑफलाईन दुकान मालकांनी या सेलमध्ये सहभाग नोंदवला असून ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करत आहेत.”
 
“कंपनीच्या मते मंचावरील विक्रेते आणि मोबाईल फोन, असॉर्टेड अॅक्सेसरीज, इलेक्ट्रॉनिक्स, होम आणि किचन, वर्क फ्रॉम होम आयटम्स, फॅशन, इलेक्ट्रॉनिक्स इत्यादीसह विविध प्रकारातील ब्रँडची अनेक उत्पादने १० ते ८० टक्के सवलतीत प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. तसेच ग्राहकांनी आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड, आयसीआयसीआय क्रेडिट कार्ड ईएमआय ट्रान्झॅक्शन आणि नेट बँकिंगचा वापर करून किमान ३००० रूपयांपुढे ऑर्डर खरेदी केल्यास ते १० टक्के अतिरिक्त कॅशबॅकसाठी पात्र ठरतील. अनेक कॉटेज एम्पोरियम, कारागीर आणि महिला उद्योजक हाताने तयार केलेले दागिन्यांसह बनारसी आणि कांजीवरम साडी, हाताने शिवलेले कुर्ते, विविध राज्यांतील पारंपरिक पोशाख, घर आणि स्वयंपाकघर सजावटीचे साहित्य या प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी ठेवतील.”
 
“पेटीएम मॉलचे सीओओ अभिषेक राजन म्हणाले की, “या स्वातंत्र्यदिनी, आम्हाला मोठ्या प्रमाणावर एसएमई, कारागीर, भारतीय ब्रँड्सपर्यंत पोहोचायचे आहे. तसेच डिजिटल कॉमर्सचा भविष्यातील वितरण चॅनल म्हणून लाभ घेण्यासाठी त्यांना सक्षम करायचे आहे. कोव्हिडनंतरच्या जगात ऑनलाईन उत्पादने विकण्याची क्षमता असलेल्या विक्रेते आणि निर्मात्यांना व्यवसायवृद्धी आणि विस्तारासाठी याची मदत होईल. आमच्या फ्रीडम सेलद्वारे सर्वोत्तम श्रेणीतील करार आणि अखंडित ई-कॉमर्स अनुभवासह ग्राहक खरेदीची भावना पुन्हा निर्माण केली जाईल, अशी आशा आहे. गेल्या काही महिन्यांत, आमच्या प्लॅटफॉर्मवर विक्रीत दुप्पट वाढ झाल्याचे अनुभवले. या सेलद्वारे विक्रीत वाढ होण्याची आशा आहे.”””

Continue reading

रविवारी आनंद घ्या भारती प्रताप यांच्या गायनाचा 

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात, येत्या रविवारी, ५ एप्रिलला सायंकाळी पाच वाजता संस्थेचे संस्थापक डॉ. एस. जी. जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भारती प्रताप यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम श्रीकृष्ण जोशी यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे. यावेळी...

आजपासून ‘क्रेडिट स्कोअर’ होणार दर आठवड्याला अपडेट!

बुधवार, १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष (२०२६-२७) सुरू होत असून, रिझर्व्ह बँकेने क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्या (सीआयसी'ज) जसे की, सिबिल, एक्स्पेरियन, इक्विफॅक्स आणि हाय मार्क यांच्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या कर्ज घेण्याच्या प्रक्रियेवर...

आखातातल्या गुगल, एप्पल आदी १८ कंपन्यांवर आजपासून इराणचे हल्ले

इराणविरूद्ध अमेरिका आणि इस्त्रायलच्या युद्धात सहभागी होण्यास युरोपातल्या बहुतांश सर्व देशांनी (नाटो संघटनेत असलेल्या) स्पष्ट नकार दिल्याचे समोर आले आहे. पोलंड, हंगेरी, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, स्लोव्हाकिया, इटली आदी देशांचा यात समावेश आहे. ब्रिटनने या संघर्षात अमेरिकेला अत्यंत मर्यादित...
Skip to content