HomeArchive७६ दशलक्ष विद्यार्थ्यांना...

७६ दशलक्ष विद्यार्थ्यांना मिळाले डिजिटल व्यासपीठ!

Details
  

 
केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
“शिक्षक दिनानिमित्त आयोजित केलेल्या पहिल्यावहिल्या ल’व्हिनेर नॉलेज कॉन्क्लेव्हमध्ये देशभरातील ७२ हजार शाळांमधील शिक्षण-योद्ध्यांनी डिजिटल कायापालट आणि एकात्मिक शिक्षण पद्धतीचा अवलंब करीत शालेय शिक्षकांना भविष्यासाठी सज्ज करण्याचा संकल्प हाती घेतला आहे. आगामी १२ आठवडे (नोव्हेंबर २०२०पर्यंत) या उपक्रमात ३,००० शिक्षक डिजिटल अध्यापनाचे कौशल्य शिकविणार आहेत. तसेच ७२,००० शाळांमधील १.५ लाखांहून अधिक शिक्षक आणि ७.६ कोटींच्या घरात असलेल्या शिक्षक-विद्यार्थी या शैक्षणिक डिजिटल क्रांतीमध्ये सहभागी होणार आहेत. टेक अवान्त-गार्डे मायक्रोसॉफ्ट, नॉलेज की फाऊंडेशन, लाइसी कॉर्प, इफीऑनलाईन आणि रोशिनी सोशल स्कूलिंग यांच्या सहयोगाने विद्यार्थ्यांसाठी ल’व्हिनेर नॉलेज कॉन्क्लेव्ह हे नवे डिजिटल व्यासपीठ विनामूल्य उपलब्ध करण्यात आले आहे.”
 
“या मोहिमेत टेक अवान्त-गार्डेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अली सैत यांनी समन्वयक म्हणून भूमिका बजावलेल्या चर्चासत्रात, मुख्य वक्ते म्हणून नामवंत शिक्षण-योद्ध्यांनी सहभाग केला. ज्यामध्ये कुलभूषण शर्मा (अध्यक्ष, निसा), व्हिन्सेंट केव्ही (सचिव, एएसआयएससी), डॉ. विनी जौहरी (संचालक-शिक्षण आणि उद्योग तज्ज्ञ, मायक्रोसॉफ्ट), डॉ. दक्षायिनी कन्ना (संचालक, प्राचार्या, हार्वेस्ट इंटरनॅशनल स्कूल), वंदना बाईक (अनुसंधान व विकास आणि नाविन्य तसेच उच्च शिक्षण संचालक, गोवा) सोनिया गर्चा (सीएस पाठशाला), रोशनी कुमार (मुख्य संरक्षक, रोशनी, सोशल स्कूलिंग) आणि प्रवीण राय (सीओओ, एनपीसीआय) यांच्यासह देशभरातील अनेक शाळांचे प्राचार्य आणि शिक्षक सहभागी झाले होते. ”
  

 
“आपल्या प्रास्ताविकपर निवेदनात, मायक्रोसॉफ्टचे संचालक डॉ. विनी जौहरी यांनी जागतिक ख्यातकीर्त आणि नोबेलविजेत्या शैक्षणिक कार्यकर्त्या मलाला युसूफजाई यांचे एक वाक्य उदधृत केले. त्या म्हणाल्या होत्या की, “ते मला थांबवू शकत नाहीत. भले घरी असो, शाळेतून असो वा अन्य कोणत्याही ठिकाणी जावे लागले तरी मी माझे शिक्षण मिळवूनच राहिन.” त्याचप्रमाणे मायक्रोसॉफ्टचे जागतिक मुख्याधिकारी सत्या नाडेला म्हणाले आहेत की, “कोविड-१९ आजारसाथीने आपल्या काम आणि जीवनाच्या प्रत्येक पैलूला व्यापून टाकले आहे. या अशा आव्हानात्मक काळात मायक्रोसॉफ्टने जेथे दोन वर्षांचा कालावधी लागला असता ते काम केवळ दोन महिन्यांत यशस्वीपणे पूर्ण होताना दिसत आहे.” अशीही आशा त्यांनी व्यक्त केली.”

Continue reading

पंतप्रधान मोदी सेशेल्सच्या सर्वोच्च बहुमानाने सन्मानित

व्हिक्टोरिया (सेशेल्स) येथे एका विशेष सोहळ्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज सेशेल्सचे अध्यक्ष डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्या हस्ते ‘गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन’ हा पहिला सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. पंतप्रधानांच्या पर्यावरणपूरक नेतृत्त्वासाठी, विकसनशील देशांच्या हितासाठी केलेले प्रयत्न, सागरी...

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...
Skip to content