HomeArchiveमराठमोळ्या युवकाचा सातासमुद्रापार...

मराठमोळ्या युवकाचा सातासमुद्रापार सन्मान!

Details
  

 
तुषार शिंदे (चिपळूण)
 
hegdekiran17@gmail.com
 
मराठमोळ्या युवकाचा युरोपिअन क्रिकेट संघटनेकडून सन्मान. ऑस्ट्रियन क्रिकेट लीग तसेच जर्मनी-ऑस्ट्रिया आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट सामन्यात मॅच ऑफिशिअल म्हणून उल्लेखनीय कामगिरी. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणचा टेनिस क्रिकेट खेळाडू निलेश कांबळीचा ऑस्ट्रिया देशातील प्रथमश्रेणीच्या सामन्यांमध्ये तसेच युरोपियन लिगच्या अंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पंच म्हणून उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ऑस्ट्रियन क्रिकेट ओसिसिएशनतर्फे नुकताच सन्मान करण्यात आला.
 
ऑस्ट्रियन क्रिकेट संघटनेच्या पंच प्रशिक्षण उपक्रमातील स्टेज १ व स्टेज २च्या परीक्षा पार करत निलेशने येथील स्थानिक टी २० तसेच ५० षटकांच्या सामन्यांमध्ये पंच म्हणून प्रभावी कामगिरी केली. आयसीसीच्या युरोपियन देशांमधील क्रिकेटच्या प्रसाराच्या उद्देशाने घेण्यात येणाऱ्या युरोपियन क्रिकेट लीगच्या ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथे झालेल्या जर्मनी-ऑस्ट्रिया आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट संघांदरम्यानच्या सामन्यातही मॅच ऑफीशियल म्हणून त्याने अचूक कामगिरी पार पाडली. याचाच गौरव ऑस्ट्रियन क्रिकेट संघटनेचे चेअरमनच्या हस्ते विशेष कामगिरीचे प्रशस्तिपत्रक देऊन निलेशला गौरवण्यात आले. या गौरवात निलेश कांबळी याने पंच म्हणून केलेल्या निपक्षपाती व अचूक कामगिरीचे कौतुक केले असून यापुढे आयसीसीच्या देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पंचांची जबाबदारी देण्यासाठीही शिफारस करण्यात आली आहे.
  

 
“कापसाळ, चिपळूण येथे जन्मलेल्या निलेशने चिपळूणच्या दातार महाविद्यालयातून कला शाखेत पदवी घेऊन सावर्डे येथे व्यवस्थापनातील पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला. आपल्या अष्टपैलू खेळाने त्याने डिबीजे महाविद्यालयाच्या संघाला आंतरमहाविद्यालयीन सीके नायडू स्पर्धा तसेच मुंबई विद्यापीठ झोनल लेव्हलचेही जेतेपद मिळवून दिले होते. निलेशने रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध टेनिस खेळाडू असलेला मोठा बंधू नंदू कांबळी याच्यासोबत स्थानिक टेनिस क्रिकेट स्पर्धांमध्ये ऑल राऊंडर म्हणून आपला वेगळा ठसा उमटवला. मुंबईत एल अँड टी, सिमेन्स इ. आयटी कंपन्यांमध्ये कार्यरत असताना लेदर बॉलच्या कॉर्पोरेट क्रिकेट लिगमध्ये सहभागी होत प्रभावी कामगिरी केली. सध्या निलेश युनायटेड नेशन्सच्या आयएइए आस्थापनेच्या ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना येथील हेड क्वार्टरमध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत आहे.”
 
“लहानपणापासून खेळाची आवड जोपासणाऱ्या निलेशने स्थानिक टेनिस क्रिकेटमध्ये चिपळूणच्या इलेव्हन फायटर्स, सुधीर इलेव्हन तसेच रत्नागिरीच्या आवाज संघाचे प्रतिनिधित्व केले. आपल्या कर्तृत्त्वाने एवढ्या उंचीवर असताना आपल्या यशाचे श्रेय कोकणात असणाऱ्या मातृभूमीतील टेनिस क्रिकेटच्या सहकाऱ्यांना देतो. निलेशची यशस्वी घोडदौड पाहता चिपळूणचा हा सुपुत्र भविष्यात सायमन टोफेलच्या बरोबर पंच म्हणून आंतरराष्ट्रीय सामन्यात दिसेल आणि रत्नागिरीसह महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवेल अशी खात्री त्याच्या सर्व सहकाऱ्यांना वाटते. चिपळूणसारख्या छोट्या शहरातील युवकाने सातासमुद्रापार मिळवलेल्या या उत्तुंग यशाबद्दल त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.”

Continue reading

पंतप्रधान मोदी सेशेल्सच्या सर्वोच्च बहुमानाने सन्मानित

व्हिक्टोरिया (सेशेल्स) येथे एका विशेष सोहळ्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज सेशेल्सचे अध्यक्ष डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्या हस्ते ‘गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन’ हा पहिला सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. पंतप्रधानांच्या पर्यावरणपूरक नेतृत्त्वासाठी, विकसनशील देशांच्या हितासाठी केलेले प्रयत्न, सागरी...

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...
Skip to content