Homeएनसर्कलक्रिकेटचा नव्हे तर,...

क्रिकेटचा नव्हे तर, गावसकरांनी घेतला जनसंवादाचा क्लास!

विश्वविख्यात क्रिकेटपटू सुनील गावसकर यांच्याकडून उत्कृष्ट क्रिकेटपटू कसे व्हावे याचे मार्गदर्शन किती जणांनी घेतले याची कल्पना नाही. मात्र, भारतातल्या ८ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून जनतेशी संवाद कसा साधावा, याचे मार्गदर्शन मात्र नक्की घेतले.

लीड या भारतातील स्कूलएडटेक क्षेत्रातल्या आघाडीच्या कंपनीने सुनील गावसकर यांचा जनसंवादावरील (पब्लिक स्पीकिंग) मास्टरक्लास नुकताच आयोजित केला होता. हे सत्र लीडच्या भारतातल्या सहयोगी शाळांतल्या ८ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आले.

क्रिकेटच्या विश्वातले एक महान फलंदाज तसेच टीव्ही समालोचक सुनील गावसकर यांच्या उपस्थितीनेच विद्यार्थी आनंदून गेले होते. त्यांनी एक जीवन व्यवहारकौशल्य म्हणून जनसंवादाच्या महत्त्वावर चर्चा केली. जनसंवादच एक प्रभावी संवादक होण्याचा दरवाजा उघडून देतो, असे गावसकर यांनी यावेळी सांगितले.

लहान मुलांमधली जनसंवादाची कौशल्ये विकसित करण्याबाबत, मोठ्या व्यासपीठावरून बोलण्याबाबत त्यांना वाटणारी भीती नाहीशी करण्याविषयी, शालेय शिक्षणाच्या भूमिकेबद्दलची आपली मतेही त्यांनी विद्यार्थ्यांपुढे मांडली. त्यानंतर त्यांनी श्रोत्यांशी संवाद साधताना देहबोली आणि जनसंवाद यांच्यातील सहसंबंध काय असतो यावरचे आपले विचार मांडले. भाषणकौशल्य सुधारण्याचे काही उपक्रमही त्यांनी सांगितले.

या मास्टरक्लासमध्ये गावसकर यांनी टीव्ही समालोचक म्हणून त्यांनी केलेला ३० वर्षांचा प्रवास विद्यार्थ्यांपुढे मांडला आणि मोठ्या समुदायाशी प्रभावीपणे संवाद साधण्याचा आत्मविश्वास त्यांनी लहान वयातच कसा विकसित केला, याचे काही किस्से सांगितले.

लहान मुलांना लोकांपुढे बोलण्याची भीती वाटते आणि कोविड साथीमुळे परिस्थिती अधिकच कठीण झाली आहे. या काळात व्यक्तिगत स्तरावरचा संवाद खूपच कमी झाला होता. आत्मविश्वास आणि भाषेवर प्रभुत्व विकसित करणे प्रभावी संवादातील तसेच मोठ्या समुदायाशी संवाद साधण्यातील दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ही कौशल्ये प्रत्येक शाळेत, प्रत्येक मुलाला लहान वयापासून शिकवली गेली पाहिजेत, असेही गावसकर म्हणाले.

लीडद्वारे चालवली जाणारी मास्टरक्लास मालिका हा शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण अध्ययनासाठीचा भारतातला पहिलाच उपक्रम आहे. जगविख्यात तज्ज्ञांकडून शिकण्याची संधी हा उपक्रम देतो. ही संधी छोट्या शहरांतल्या व गावांतल्या मुलांना यापूर्वी कधीच उपलब्ध होत नव्हती. सर्जनशील (क्रिएटिव) लेखनावरचा पहिला मास्टरक्लास प्रख्यात लेखक चेतन भगत यांनी घेतला होता. दुसरा मास्टरक्लास प्रख्यात टेनिसपटू सानिया मिर्झाने घेतला. यात तिने फिटनेस आणि योग यांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

लीडचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुमीत मेहता यावर म्हणाले की,“लीड नेटवर्क आपल्या विद्यार्थ्यांना अभूतपूर्व अशा संधी मिळवून देते. या संधी पूर्वी कधीही त्यांना उपलब्ध नव्हत्या. उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण उपलब्ध व परवडण्याजोगे करण्याचे उद्दिष्ट सर्वात पुढे ठेवून आम्ही क्रिकेट समालोचक सुनील गावसकर यांच्यासोबत जनसंवादावरचा हा मास्टरक्लास घेतला. स्थानिक शाळांमध्ये शिक्षकांद्वारे जे काही शिकवले जाते त्याला हे शिक्षण पूरक ठरावे असा या उपक्रमामागचा उद्देश आहे. चेतन भगत, सानिया मिर्झा आणि सुनील गावसकर यांनी घेतलेले शक्तिशाली मास्टरक्लासेस विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासासाठी मदत करतील, याची खात्री मला वाटते.”

व्यवसायाने वकील व उद्योजिका असलेल्या, बरेलीतील ज्ञानया शाळेच्या संचालक अपूर्वा अगरवाल विद्यार्थ्यांसाठी जनसंवादावरील आणखी तीन सत्र घेणार आहेत. मास्टरक्लास मालिकेत विद्यार्थ्यांसाठी मेंटल मॅथ्स, व्यक्तिमत्व विकास, परीक्षेसारख्या महत्त्वाच्या दिवसांसाठी करण्याची तयारी या कौशल्यांवर भर देणारी सत्रे घेतली जाणार आहेत. ही सत्रे अनुक्रमे कॅप्टन रघू रामन, रणजित दिसले आणि सायना नेहवाल घेणार आहेत.

लीड ही लीडरशिप बोएलव्हार्डने प्रमोट केलेली भारतातील स्कूल एडटेक विभागातील आघाडीची कंपनी आहे. २०१२मध्ये सुमीत मेहता आणि स्मिती देवरा यांनी या कंपनीची स्थापना, भारतातील शालेय शिक्षणाचा कायापालट घडवण्याच्या उद्देशाने केली. यामध्ये तंत्रज्ञान, अभ्यासक्रम व अध्यापनशास्त्र यांच्या मिलाफातून अध्यापन व अध्ययनाची एक एकात्मिक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती आणि देशभरातल्या शाळांमधल्या शिक्षकांची कामगिरीही सुधारत आहे.

आज लीड ४००हून अधिक शहरांतील २०००हून अधिक शाळांना सेवा देते आणि ८ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचते. १० हजारांहून अधिक शिक्षकांना सक्षम करते. लीडची नवोन्मेषकारी तसेच अतिप्रभावी एकात्मिक अध्ययन प्रणाली शाळा, शिक्षक व पालकांची प्रत्येक मुलाच्या एकंदर वाढ व विकासातील भूमिका लक्षणीयरित्या सक्षम करते आणि मुलांना सर्वोच्च दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देते.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content