Homeएनसर्कलश्री साई मंदिरातला...

श्री साई मंदिरातला प्रवेश फक्त ऑनलाईन पासधारकांनाच!

राज्‍य शासनाने उद्यापासून म्हणजेच ०७ ऑक्‍टोबरपासून महाराष्‍ट्रातील सर्व धार्म‍िक स्‍थळे खुली करण्‍याचे आदेश दिले आहेत. त्‍यानुसार शिर्डीच्या श्री साईबाबा समाधी मंदिरात दररोज १५ हजार साईभक्‍तांना दर्शनाचा लाभ दिला जाणार आहे. हे दर्शन पासेस फक्‍त ऑनलाईन उपलब्‍ध असतील. त्‍यामुळे ऑनलाईन बुकींग निश्चित झाले असेल अशाच साईभक्‍तांनी शिर्डीत दर्शनाकरीता यावे, असे आवाहन शिर्डी संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी केले आहे.

जगभरात, देश व राज्‍यात आलेल्‍या कोरोनाच्‍या संकटामुळे प्रतिबंधात्‍मक उपाययोजना म्‍हणून शासनाच्‍या वतीने लॉकडाऊन करण्‍यात आले होते. त्यामुळे ०५ एप्रिल २०२१पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्‍तांना दर्शनासाठी बंद ठेवण्‍यात आले होते. २४ सप्‍टेंबर २०२१ रोजी राज्‍य शासनाने ०७ ऑक्‍टोबरपासून घटस्‍थापनाच्‍या मुहुर्तावर महाराष्‍ट्रातील सर्व धार्म‍िक स्‍थळे खुली करण्‍याचे आदेश दिले आहेत.

श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्‍तांना दर्शनाकरीता खुले करण्‍यासाठी साईभक्‍तांच्‍या आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने विविध उपाययोजना करण्‍याकरीता श्री साई सभागृह येथे जिल्‍हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्‍या अध्‍यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्‍यात आली होती. या बैठकीस पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्‍हा परिषदचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, उप जिल्‍हाधिकारी संदीप निचित, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, उप विभागीय पोलीस अधीक्षक संजय सातव, संस्‍थानचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, तहसिलदार कुंदन हिरे, शिर्डी नगरपंचायतचे मुख्‍याधिकारी काकासाहेब डोईफोडे व अहमदनगर जिल्‍ह्यातील इतर देवस्‍थानचे पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत ठरल्यानुसार ०७ ऑक्‍टोबर २०२१ रोजीच्‍या काकड आरतीनंतर समाधी मंदिर दर्शनाकरीता खुले करण्‍यात येणार असून सकाळी ०६.०० ते रात्रौ १०.०० यावेळेत मंदिर खुले राहणार आहे. दिवसभरात १५ हजार भाविकांना दर्शनाकरीता प्रवेश दिला जाणार असून हे सर्व दर्शन पासेस फक्‍त ऑनलाईन उपलब्‍ध असतील. यामध्‍ये १० हजार निःशुल्‍क व ०५ हजार सशुल्‍क पासेस असतील. प्रत्‍येक तासाला ११५० साईभक्‍तांना मंदिरात प्रवेश दिला जाईल.

साईभक्‍तांना दर्शनाकरीता online.sai.org.in या संकेतस्‍थळावर ऑनलाईन दर्शन पासेसची बुकींग करावी लागेल. तसेच प्रत्‍येक आरतीकरीता एकूण ७५ साईभक्‍तांना आरतीसाठी प्रवेश देण्‍यात येणार असून ४५ देणगीदार साईभक्‍त व २० साईभक्‍तांना ऑनलाईनव्‍दारे उपलब्‍ध असेल. प्रत्‍येक आरतीस प्रथम येणाऱ्या शिर्डी ग्रामस्‍थांना १० पासेस देण्‍यात येतील. ग्रामस्‍थांना १० आरती पासेस हे साईउद्यान निवासस्‍थान येथून तर दर्शनाचे पासेस मारुती मंदिराशेजारील १६ गुंठे शताब्‍दी मं‍डप येथील काऊंटरवर दिले जाणार आहेत.

ग्रामस्‍थांना मतदान ओळखपत्र व आधारकार्डाशिवाय मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. सर्व साईभक्‍तांनी दर्शनाकरीता जाताना मास्‍कचा वापर करावा व सामाजिक अंतराचे (०६ फूट अंतर ठेवून आखणी करण्यात आलेल्या मार्कींगप्रमाणे) पालन करावे. मास्‍कचा वापर न करण्‍याऱ्या साईभक्‍तांना तसेच १० वर्षांखालील मुलांना, गरोदर स्त्रिया, ६५ वर्षांवरील व्‍यक्‍ती व आजारी व्‍यक्‍तींना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. याशिवाय मंदिरात फुले, हार व इतर पूजेचे साहित्‍य नेण्‍यास मनाई आहे. तसेच गर्दी टाळण्‍याकरीता सुरुवातीचे काही दिवस दर गुरुवारची नित्‍याची पालखी बंद राहील. याबरोबरच श्री साईप्रसादालय, मंदिरातील साई सत्‍यव्रत पूजा, अभिषेक पूजा, ध्‍यान मंदिर व पारायण हॉल बंद राहतील.

दर्शनासाठी भाविकांना गेट नंबर ०२मधून प्रवेश दिला जाणार असून व्‍दारकामाई मंदिरातून, समाधी मंदिरामधून दर्शन घेऊन गुरुस्‍थान मंदिरमार्गे ०४ व ०५ नंबर गेटव्‍दारे बाहेर पाठविले जाईल. दर्शन रांगेत सॅनिटायझेशन, थर्मल स्क्रिनिंग व पाय धुण्‍याची व्‍यवस्‍था करण्‍यात येणार आहे. तसेच ज्‍या साईभक्‍तांना ताप असेल अशा साईभक्‍तांना तत्‍काळ उपचाराकामी कोविड केअर हॉस्पिटलमध्‍ये तपासणी व उपचारासाठी दाखल करण्‍यात येईल. तसेच मंदिर व मंदिर परिसरात धूम्रपान करणे, थुंकण्यास बंदी आहे. त्‍याचे उल्‍लंघन करणाऱ्यांवर दंडात्‍मक कारवाई करण्‍यात येईल असे बानायत यांनी सांगितले.

ज्‍या साईभक्‍तांचे दर्शनाकरीता ऑनलाईन बुकींग निश्चित झालेले असेल अशाच साईभक्‍तांनी शिर्डी येथे दर्शनाकरीता यावे, अन्‍यथा गैरसोय होऊ शकते. याबरोबरच जे साईभक्‍त आजारी आहेत अशा साईभक्‍तांनी दर्शनाकरीता येऊ नये. भक्तांनी दर्शन पासेसवरील नमूद वेळेप्रमाणेच (स्‍लॉट नुसार) भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार असून नमूद वेळेच्या १५ मिनिटे अगोदर प्रवेशव्‍दारावर उपस्थित राहवे, असे आवाहनही बानायत यांनी केले आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content