बँकेतल्या कर्मचाऱ्यांसाठी यंदाचा ऑक्टोबर, रजेसाठी लयलुटीचा महिना असणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत यादीप्रमाणे देशातल्या विविध भागात मिळून ऑक्टोबर २०२१, या महिन्यातले तब्बल २१ दिवस बँकेच्या कर्मचाऱ्यांना सुट्टीचा आनंद लुटता येणार आहे. यामध्ये १४ दिवस विविध कारणांसाठी असलेल्या सुट्ट्या तसेच उरलेले सात दिवस दुसरा व चौथा शनिवार तसेच रविवार असणार आहे.
धार्मिक, सणासुदीच्या रजा, राज्यस्तरीय उत्सव आदींचा रजांच्या कारणांमध्ये समावेश आहे. हॉलिडे अंडर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट एक्ट, रिअल टाईम ग्रोस सेटलमेंट हॉलिडे आणि बँक्स क्लोझिंग अकाऊंट्स, आदी कायद्याखाली या रजा जाहीर करण्यात आल्या आहेत. प्रत्येक राज्यानुसार या रजांचे आकडे बदलत असले तरी महाराष्ट्रात नियमित रजांसह १० दिवस बँका सर्नसामान्य ग्राहकांसाठी बंद असतील.
ही आहे बँकांच्या सुट्टीची यादी-
- १ ऑक्टोबर- अर्धवार्षिक क्लोझिंग ऑफ बँक अकाऊंट्स (गंगटोक)
- २ ऑक्टोबर- महात्मा गांधी जयंती (देशभर)
- ३ ऑक्टोबर- रविवार
- ६ ऑक्टोबर- महालय (सर्वपित्री) अमवास्या (आगरतळा, बेंगळुरू व कोलकाता)
- ७ ऑक्टोबर- मेरा चाओरेन हॉबा ऑफ लायनिंग्थू सन्माही (इम्फाळ)
- ९ ऑक्टोबर- दुसरा शनिवार
- १० ऑक्टोबर- रविवार
- १२ ऑक्टोबर- दुर्गा पूजा (महा सप्तमी) (आगरतळा, कोलकाता)
- १३ ऑक्टोबर- दुर्गा पूजा (महा अष्टमी) (आगरतळा, भुवनेश्वर, गंगटोक, गुवाहाटी, इम्फाळ, कोलकाता, पाटना, रांची)
- १४ ऑक्टोबर- दुर्गा पूजा/दसरा (महा नवमी)/आयुथा पूजा (आगरतळा, बेंगळुरू, चेन्नई, गंगटोक, गुवाहाटी, कानपूर, कोची, कोलकाता, लखनौ, पाटना, रांची, शिलाँग, श्रीनगर, थिरूवनंथपुरम)
- १५ ऑक्टोबर- दुर्गा पूजा/दसरा (विजयादशमी) (इम्फाळ व शिमला वगळता इतरत्र देशभर)
- १६ ऑक्टोबर- दुर्गा पूजा (दसैन) (गंगटोक)
- १७ ऑक्टोबर- रविवार
- १८ ऑक्टोबर- कटी बिहू (गुवाहाटी)
- १९ ऑक्टोबर- ईद-ए-मिलाद (ईद-ए-मिलादुन्नबी) (अहमदाबाद, बेलापूर, भापाळ, चेन्नई, डेहराडून, हैदराबाद, इम्फाळ, जम्मू, कानपूर, कोची, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची, श्रीनगर, थिरूवनंथपूरम)
- २० ऑक्टोबर- महर्षि वाल्मिकी जयंती/लक्ष्मी पूजा/ईद-ए-मिलाद (आगरतळा, बेंगळुरू, चंदीगढ, कोलकाता व शिमला)
- २२ ऑक्टोबर- ईदनंतरचा शुक्रवार (जम्मू, श्रीनगर)
- २३ ऑक्टोबर- चौथा शनिवार
- २४ ऑक्टोबर- रविवार
- २६ ऑक्टोबर- एक्सेशन डे (जम्मू, श्रीनगर)
- ३१ ऑक्टोबर- रविवार

