Homeएनसर्कलगोंगाट रोखा मधमाश्यांच्या...

गोंगाट रोखा मधमाश्यांच्या पोळ्यासारख्या शीटने!

एका भारतीय संशोधकाने ध्वनीशोषक पॅनेल म्हणून मधमाशांच्या पोळ्यासारख्या असलेल्या कागदाच्या शीट आणि पॉलिमर रचना तयार केल्या असून ध्वनीप्रवाह उर्जेचे लो फ्रिक्वेन्सीमध्ये रुपांतर करणारी पॅनेल म्हणून त्यांचा वापर करता येईल. या तंत्रज्ञानाचा उपयोग ध्वनीप्रवाह नियंत्रणप्रणाली तयार करण्यासाठी त्याचबरोबर पर्यावरणीय गोंगाट नियंत्रणासाठी होणार आहे.

नेहमी वापरली जाणारी सामग्री हाय फ्रिक्वेन्सी नियंत्रणासाठी उपयुक्त ठरत असे. मात्र, मधमाशांचे नैसर्गिक पोळे त्यांच्या भूमितीय रचनेमुळे हाय फ्रिक्वेन्सीबरोबरच लो फ्रिक्वेन्सी नियंत्रणासाठीदेखील प्रभावी ठरत असल्याचे दिसून आले. या संदर्भातील सैद्धांतिक विश्लेषण आणि प्रयोगाद्वारे केलेल्या तपासणीतून असे दिसून आले की, अशाप्रकारच्या रचना ध्वनीप्रवाह उर्जेचे कंपन उर्जेत रुपांतर करतात. या रचनांमध्ये असलेल्या भितींमध्ये ओलावा टिकवण्याच्या गुणधर्मामुळे या कंपन उर्जेतून उष्णता निर्माण होऊ लागत असल्याचेही दिसून आले. हा गुणधर्म कृत्रिम पद्धतीने विकसित केल्यास ध्वनीप्रदूषण नियंत्रणासाठी एक अतिशय किफायतशीर अभियांत्रिकी उपाययोजना उपलब्ध होऊ शकते.

हैदराबाद आयआयटीच्या मेकॅनिकल ऍन्ड एरोस्पेस इंजिनियरिंग विभागात अध्यापक असलेले डॉ. बी. वेंकटेशम आणि डॉ. सूर्या यांनी बायोमिमेटिक डिझाईन तंत्रज्ञानाचा वापर करून या गुणधर्मावर आधारित कमी जाडीची परंतु अतिशय मजबूत असलेली अकौस्टिक पॅनेल्स तयार केली आहेत. मधमाशांच्या पोळ्यांमध्ये ध्वनीप्रवाह उर्जा नियंत्रित करण्यासाठी कारणीभूत असलेले भौतिक विज्ञान समजून घेणे आणि त्या रचनेची नक्कल तयार करणे याचा या तंत्रज्ञानात समावेश आहे.

या संशोधकांच्या टीमने एक गणितीय मॉडेल तयार केले आणि योग्य त्या मापदंडांची गणना केली आणि त्यानंतर त्याआधारे ही रचना तयार केली. सुरुवातीला काही नमुने तयार केल्यावर तशाचप्रकारचे जास्त नमुने बनवण्यात आले. प्रारंभिक रचना (प्रोटोटाईप) तयार करताना त्यांनी दोन वेगळ्या प्रकारच्या पदार्थांचा वापर केला. एका रचनेत विस्तारापूर्वीचे मधमाशीचे पोळे जसे तयार होते त्या प्रक्रियेद्वारे कागदी पोळे बनवण्यात आले तर दुसरी रचना हॉटवायर तंत्रज्ञानावर आधारित पॉलिमर पोळ्याची होती.

पॉलिप्रोपिलिन स्ट्रॉचे ढीग तुकड्यांमध्ये कापून ही पॅनेल तयार करण्यात आली. हॉटवायरने हे तुकडे कापले जात असल्याने ते स्ट्रॉ एकमेकांना चिकटवतही होते. हे तंत्रज्ञान ध्वनीप्रवाह उर्जेचे उत्सर्जन करणारी कमी जाडीची आणि जास्त मजबुती असलेली पॅनेल तयार करण्यासाठी उपयुक्त आहे.

अधिक माहितीसाठीः

डॉ. बी. वेंकटेशम- venkatesham@mae.iith.ac.in

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content