Homeबॅक पेजआंतरमहाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धेत...

आंतरमहाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धेत खालसा कॉलेज चमकले!

महाराष्ट्रातल्या रत्नागिरी येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मुंबई विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धेत माटुंगा येथील गुरु नानक खालसा महाविद्यालयाच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत ७ सुवर्ण, ३ रौप्य आणि ३ कांस्य अशी एकूण १३ पदके पटकावली. या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर महाविद्यालयाने मुलांच्या गटात सलग सातव्या वर्षी प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान संपादन केला.

पदकविजेत्या खेळाडूंना राजेश मुराव यांचे मार्गदर्शन मिळाले. त्यांचा या यशाबद्दल खालसा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रत्ना शर्मा आणि क्रीडा संचालिका जसबीर कौर‌ मक्कर यांनी सर्व पदकविजेत्यांचे खास अभिनंदन केले आहे.

सुवर्णपदक विजेते-

१. दिवेश बांबणे, २. श्रीजय भगत, ३. शाहिद शेख, ४. आर्यन येवले, ५. निहाल भोईर, ६. प्रसाद पाटील, ७. श्रीनिधी काटकर.

रौप्यपदक विजेते- १. ओम कदम, २. विराज साळ.

कांस्यपदक विजेते- १. श्रीधर मलिक, २. असद वली, ३. अमर्त्य पोळ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

पं. हृदयनाथ मंगेशकरांच्या उपस्थितीने रंगला ‘आशाताई आणि मी’!

मुंबईतल्या बोरीवली पश्चिम येथील स्वररंग प्रतिष्ठान, या संस्थेने आयोजित केलेला भावगंधर्व पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा 'आशाताई आणि मी' हा कार्यक्रम नुकताच प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिर, बोरिवली येथे संपन्न झाला. यावेळी नव्वदीच्या घरात पोहोचलेले पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या उपस्थितीने रसिकांच्या तुडूंब...

रौनक, तन्मय, दिनेश,अमृता ठरले बेंचप्रेस स्पर्धेचे विजेते

पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन, रायगड यांच्यातर्फे व्ही. के. हायस्कूल, पनवेल येथे दीपक पाटकरच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या क्लासिक व इक्विप्ड बेंचप्रेस स्पर्धेत रौनक जितेकर, तन्मय पाटील, दिनेश पवार आणि अमृता भगतने आपापल्या गटांत सर्वोतम लिफ्टरचा मान मिळवला. समस्त पाटकर कुटुंबियांच्या सौजन्याने...

विनय आपटेंच्या स्मृतीदिनानिमित्त लघुपट स्पर्धा

सुप्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्माते दिवंगत विनय आपटे ह्यांच्या १3व्या स्मृतीदिनानिमित्त विनय आपटे प्रतिष्ठान आणि मुंबईतल्या विलेपार्ले येथील साठये महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने लघुपट (शॉर्ट फिल्म) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शॉर्ट फिल्म पाठवण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२६ आहे....
Skip to content