Homeडेली पल्समहाराष्ट्राच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना...

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना किंमत शून्य…

भीमाशंकर-कर्जत येथील टोरंट पॉवरच्या 3000 मेगावॅट पंप स्टोरेज प्रकल्पासाठी सुरू असलेल्या जंगलतोडीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी कर्जत पोलीस ग्राउंडवरील सभेतून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्रात काय करायचे, काय नाही, हे सगळे दिल्लीतून ठरते, असे सांगून राज यांनी वृक्षतोड आणि परिसराची दुर्दशा पाहून खंत व्यक्त केली. ते म्हणाले, “ही तोडलेली झाडे पाहून वाटले की, आपण जंगलाच्या अंतिम संस्काराला आलोय! आज जंगलतोड झाली तिथे गेलो होतो, तोडलेली लाकडं रचून ठेवली होती. ते बघताना मला वाटलं जंगलाच्या अंतिम संस्काराला आलो आहे. इतक्या वर्षांची जुनी झाडे, कोणत्या तरी गुजरात्यासाठी कापून टाकत आहेत. पक्षी घिरट्या घालत होते, आज पक्षी घिरट्या घालत आहेत, उद्या तुमच्यावर घिरट्या घालायची वेळ येणार आहे.”

महाराष्ट्र दिल्लीतून चालतोय

“केंद्राने आणि खासगी कंपनीने ठरवून तो प्रस्ताव आम्हाला दिला, हे खुद्द मुख्यमंत्र्यांनीच सांगितले आहे. महाराष्ट्रात काय करायचं, काय नाही.. हे सगळे दिल्लीमध्ये ठरते. उद्योगपती थेट दिल्लीला जाऊन मोदी-शाहांना भेटतात आणि जमीन मागतात. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना केंद्रात बसलेल्या दोघांकडून शून्य किंमत आहे. गुजरातचे दोघे आमचा सह्याद्री पोखरणार का?”, असा सवाल त्यांनी केला.

लाडकी बहीण योजनेवर प्रहार

“माता-भगिनींना 1,500 रुपये लाडकी बहीण योजनेतून… अशा योजनांमधून तुम्हाला विकत घेतले जात आहे आणि तुमची तोंडे बंद केली जात आहेत. 30-35 टक्के जनता आणि बाकी निवडणूक आयोग आहेच.”, असे ते म्हणाले.

23 प्रकल्पांचा पर्दाफाश

राज ठाकरे म्हणाले की, “हा एकटा प्रकल्प नाही. सह्याद्रीच्या कुशीत असे 23 प्रकल्प येणार आहेत. यातले 3 केंद्राचे, बाकी 20 अदाणी, टोरंट, रिन्यू, मेगा, ग्रीनको यांचे खासगी प्रकल्प आहेत. टेंडर नाही, काही नाही, बस असेच देऊन टाकले. महाराष्ट्रात एकूण 236 वीज प्रकल्प येत आहेत, हे सगळं डेटा सेंटरसाठी बाहेरच्या लोकांसाठी चाललं आहे.”

दरम्यान, या सभेपूर्वी राज ठाकरे यांनी साय डोंगरावर जाऊन तोडलेल्या झाडांची पाहणी केली आणि आदिवासी ग्रामस्थांशी संवाद साधला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

इस्रायलमधले नेतन्याहू सरकार डामाडोल

इस्रायलच्या निवडणुकीत पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू किंवा त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी गाडी आयझेनकोट या दोघांनाही स्पष्ट बहुमताचा मार्ग नाही. सुरुवातीच्या 50% मतमोजणीनंतर नेतन्याहू यांच्या गटाला 53-55 जागा आणि आयझेनकोट यांच्या विरोधी गटाला 48-49 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर अरब पक्षांना 16...

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाईभत्त्यात 3 टक्के वाढ!

दिवाळीच्या तोंडावर केंद्रातल्या मोदी सरकारने 1.16 कोटी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठी भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्ता (डीए) आणि महागाई सवलत (डीआर)मध्ये 3% वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली. यासाठी 10,016 कोटी...

मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना ३३ हजारांचे सानुग्रह अनुदान

मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी गोड करण्याच्या प्रयत्नात पालिका प्रशासनाकडून ३३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी आज एका पत्रकार परिषदेत केली. नोव्हेंबर महिन्याच्या नियमित वेतनासोबत ३३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान अदा करण्याचे निर्देश...
Skip to content