Homeएनसर्कलफ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन...

फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न

फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन मंगळवारी सीरियाच्या दमास्कस दौऱ्यावर होते. या दौऱ्यात ते सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या भेटीकरीता निघाल्यानंतर ते उतरलेल्या हॉटेलच्या जवळ दोन बॉम्बस्फोट झाले. हे स्फोट मॅक्रॉन यांच्यावरील अयशस्वी हल्ला असल्याचे मानले जात आहे. असद राजवट पडल्यानंतर सीरियाला भेट देणारे ते पहिले युरेपीय देशांतले राष्ट्रप्रमुख आहेत. मॅक्रॉन ज्या फोर सिझन्स हॉटेलमध्ये थांबले होते त्या परिसरात हे बॉम्बस्फोट झाले. हॉटेल दमास्कसमधील पर्यटन मंत्रालय आणि राष्ट्रीय संग्रहालयाजवळ आहे. स्फोटाच्या वेळी मॅक्रॉन यांची मोटार तेथून निघाली होती. या स्फोटांमध्ये चार लोक जखमी झाल्याचं सीरियन सरकारी माध्यमांनी सांगितलं, ज्यात काही पोलीस होते. यात कोणचाही मृत्यू झाला नाही.

एक बॉम्ब कचऱ्याच्या डब्यात आणि दुसरा पार्क केलेल्या गाडीत ठेवला होता. मॅक्रॉन यांना स्फोटाचा आवाज ऐकू आला नाही. ते थेट राष्ट्रपती राजवाड्यात सीरियाचे अध्यक्ष अहमद अल-शारा यांना भेटायला गेले. या घटनेनंतर एक्सवर पोस्ट करत ते म्हणाले की, “अशा घटना सीरियन लोकांची पूर्णपणे सार्वभौम आणि सुरक्षित सीरियामध्ये राहण्याची इच्छा कमी करू शकत नाही”. 2024मध्ये अहमद अल-शारा यांच्या नेतृत्त्वाखालील बंडखोरांनी बशर अल-असद यांना पदच्युत केल्यापासून सीरियाला भेट देणारे मॅक्रॉन पहिले युरोपीय राष्ट्रप्रमुख आहेत. सीरियात दमास्कस विमानतळावर हवाई मालवाहतुकीचा करार केला. तसेच सीरियाची अर्थव्यवस्था आणि बँकिंग क्षेत्र पुन्हा उभं करायला फ्रान्स मदत करणार आहे. हा हल्ला शारा सरकारसमोर असलेल्या सुरक्षेच्या आव्हानांवर प्रकाश टाकतो. शारा हे पूर्वी अल कायदा कमांडर होते आणि आता ते देश स्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत.

सीरियन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तपास सुरू केला आहे. रस्ते बंद करून तेथील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मॅक्रॉन यांनी यापूर्वी सीरियावरील पाश्चात्य निर्बंध हटवण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यांच्यासोबत Total Energies आणि CMA CGM सारख्या कंपन्यांचे सीईओदेखील या दौऱ्यात आहेत. या हल्ल्यामागील अधिकृत जबाबदारी अजून कोणत्याही गटाने घेतलेली नाही. पण सध्या जे घडलं आणि सीरियाची सध्याची परिस्थिती बघता 3 मुख्य शक्यता पुढे येतात.

1. हल्ल्यामागील संभाव्य शक्यता सुरक्षा अस्थिरता: 13 वर्षांच्या युद्धानंतर सीरिया अजूनही असुरक्षित आहे. शारा यांचं सरकार नवीन आहे आणि देशात अजूनही विविध सशस्त्र गट सक्रिय आहेत. हा हल्ला “सुरक्षेची पोकळी” दाखवण्यासाठी झाला असावा. मॅक्रॉन हे असदनंतर सीरियाला भेट देणारे पहिले युरोपीय राष्ट्रप्रमुख आहेत. शारा यांचं पाश्चिमात्य देशांसोबत जवळीक साधणं काही स्थानिक गटांना मान्य नसेल. मॅक्रॉन यांनी गेल्या वर्षी सीरियावरील निर्बंध हटवण्यासाठी आवाज उठवला होता. फोर सिझन्स, हे हॉटेल दमास्कसच्या मध्यभागी आहे आणि मॅक्रॉन तिथे थांबले होते. त्यामुळे हा आंतरराष्ट्रीय लक्ष वेधण्यासाठी केलेला हल्ला असू शकतो.

2. मॅक्रॉन-शारा भेट: असद राजवट पडल्यानंतर सीरियाला भेट देणारे मॅक्रॉन पहिले युरोपीय राष्ट्रप्रमुख आहेत. दोघे दमास्कसच्या राष्ट्रपती राजवाड्यात भेटले. शारा हे पूर्वीचे अल कायदा कमांडर आहेत ज्यांनी आता पाश्चिमात्य देशांसोबत जवळीक साधली आहे. “मी आज सीरियाला त्याच्या सर्व विविधतेत भेटलो. मला प्रतिष्ठा, धैर्य आणि निर्धार दिसला” असं मॅक्रॉन यांनी पोस्ट केलं आहे.

3. आर्थिक करार: फ्रान्स आणि सीरिया असद यांचे काका रिफात अल-असद यांच्याकडून जप्त केलेली €51 दशलक्ष म्हणजे सुमारे $58.3 दशलक्ष मालमत्ता परत करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहेत. मॅक्रॉन म्हणाले की फ्रान्स सीरियाची अर्थव्यवस्था आणि बँकिंग क्षेत्र पुन्हा उभं करायला मदत करायला तयार आहे.

अधिकृतपणे अजून कोणत्याही संघटनेने या स्फोटांची जबाबदारी घेतलेली नाही. पण सीरियाची सध्याची परिस्थिती बघता या 3 प्रकारच्या गटांवर संशय असू शकतो- असद समर्थक/जुने राजवटीचे घटक, असद राजवट गेल्याने नाराज असले गट. मॅक्रॉन यांचा शारा सरकारला पाठिंबा आणि निर्बंध हटवण्याचा प्रयत्न त्यांना खटकत असेल. हा हल्ला “नवीन सरकार अस्थिर आहे” हे दाखवण्यासाठी असू शकतो.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Continue reading

    वाहू लागला मुंबईकरांची तहान भागवणारा पहिला तलाव!

    मुंबई महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी आणि मुंबईतच असणाऱ्या दोन तलावांपैकी एक पालिकेचा ‘विहार’ तलाव आज, ७ जुलैला रात्री ९ वाजता ओसंडून वाहू लागला आहे‌. हा तलाव गेल्या वर्षी १८ ऑगस्टला पूर्ण भरुन वाहू लागला होता. सन १८५९मध्ये...

    रेल्वे कामगारांचे नेते विकास गुप्ते यांचे निधन

    महाराष्ट्र हिंद मजदूर सभेचे खजिनदार, वेस्टर्न रेल्वे एम्प्लॉईज युनियनचे खजिनदार तसेच मणिबेन कारा फाउंडेशनचे डेप्युटी डायरेक्टर विकास गुप्ते यांचे आज, ६ जुलै २०२६ रोजी वयाच्या ६५व्या वर्षी कल्याण येथील रेल्वे हॉस्पिटलमध्ये अल्पशा आजाराने निधन झाले. ते शेवटच्या श्वासापर्यंत कामगार...

    पंतप्रधान मोदी सेशेल्सच्या सर्वोच्च बहुमानाने सन्मानित

    व्हिक्टोरिया (सेशेल्स) येथे एका विशेष सोहळ्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज सेशेल्सचे अध्यक्ष डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्या हस्ते ‘गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन’ हा पहिला सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. पंतप्रधानांच्या पर्यावरणपूरक नेतृत्त्वासाठी, विकसनशील देशांच्या हितासाठी केलेले प्रयत्न, सागरी...
    Skip to content