Homeन्यूज ॲट अ ग्लांसपंतप्रधान मोदी सेशेल्सच्या...

पंतप्रधान मोदी सेशेल्सच्या सर्वोच्च बहुमानाने सन्मानित

व्हिक्टोरिया (सेशेल्स) येथे एका विशेष सोहळ्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज सेशेल्सचे अध्यक्ष डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्या हस्ते ‘गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन’ हा पहिला सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. पंतप्रधानांच्या पर्यावरणपूरक नेतृत्त्वासाठी, विकसनशील देशांच्या हितासाठी केलेले प्रयत्न, सागरी अर्थव्यवस्था, हवामान कृती, सागरी साधनसंपत्तीचे शाश्वत व्यवस्थापन आणि छोट्या बेट-विकसनशील देशांच्या विकासविषयक आकांक्षांना चालना देण्यासाठी असलेल्या प्रदीर्घ बांधिलकीची दखल घेऊन त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे.

पंतप्रधानांनी हा सन्मान पर्यावरणसंवर्धन आणि हवामानबदलाचा सामना करण्यासाठी कटिबद्ध असलेल्या सर्व देशांना समर्पित केला. दोन्ही देश राजनैतिक संबंधांच्या 50 वर्षांचा टप्पा साजरा करत असताना मिळालेला हा सन्मान परस्परांतील विशेष मैत्री अधिक दृढ करणारा मैलाचा दगड ठरेल, असे ते म्हणाले. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, मिशन लाईफ, ‘एक पेड माँ के नाम’ आणि आंतरराष्ट्रीय व्याघ्र आघाडी यांसारख्या उपक्रमांद्वारे हरित पृथ्वीच्या निर्मितीसाठी पंतप्रधानांनी जपलेल्या दीर्घकालीन वचनबद्धतेची दखल म्हणून त्यांना हा सन्मान देण्यात आला. यापूर्वी त्यांना एफएओ, या संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेचे ‘अग्रिकोला पदक’, ‘सोल शांतता पुरस्कार’ आणि संयुक्त राष्ट्रांचा ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ पुरस्कारही प्रदान करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...
Skip to content