Homeन्यूज ॲट अ ग्लांसयंदाच्या अधिवेशनात हौशे-नवशे-गवशांना...

यंदाच्या अधिवेशनात हौशे-नवशे-गवशांना बसणार चाप!

येत्या २२ जूनपासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानभवन परिसरातील अनावश्यक गर्दीला आळा घालण्यासाठी यंदा प्रथमच ‘डिजिटल प्रवेशपास’ व्यवस्था लागू करण्यात येणार आहे. अधिवेशन सुरळीत, सुरक्षित आणि नियोजनबद्धरित्या पार पडावे यासाठी शिस्त व सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी या महत्त्वपूर्ण उपाययोजनेचे निर्देश दिले आहेत. या नव्या डिजिटल पास प्रणालीमुळे अधिवेशनादरम्यान होणाऱ्या अनावश्यक गर्दीवर प्रभावी नियंत्रण मिळवता येणार आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी सभापती राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत ठरल्यानुसार, दैनंदिन कामकाजात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून कार्यालयीन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी येण्या-जाण्याकरिता पर्यायी प्रवेशद्वाराची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवेश नियंत्रणव्यवस्था अधिक काटेकोर करण्यासोबतच पोलीस विभागाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुरेसा आणि चोख बंदोबस्त तैनात ठेवावा, अशा कडक सूचनाही सभापतींनी या बैठकीत दिल्या आहेत.

सुरक्षा आणि गर्दी नियंत्रणासोबतच इतर महत्त्वाच्या पायाभूत सोयी-सुविधांचाही या बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला. पावसाळ्याचे दिवस लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरक्षित मंडप उभारावेत आणि सार्वजनिक आरोग्य विभागाने सुसज्ज वैद्यकीय सुविधांसह अनुभवी डॉक्टरांची टीम तैनात ठेवावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय, अखंडित वीजपुरवठा, सुरक्षारक्षकांसाठी जेवणाची व्यवस्था, अन्नपदार्थांची गुणवत्ता तपासणी, सदस्यांसाठी अग्रक्रमाने रेल्वे आरक्षण आणि वार्तांकनासाठी येणाऱ्या पत्रकारांसाठी सुसज्ज मंडप व आवश्यक सुविधा पुरविण्याचे आदेशही सभापतींनी संबंधित विभागांना दिले आहेत.

(लेखक विक्रांत पाटील ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

हर्षद महेता, केतन परिखनंतर आता पुन्हा नवा महेता! एलआयसीचीही साथ!!

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया' (सेबी)ने गुजरातमधील सुवर्ण निर्यातदार कंपनी 'राजेश एक्सपोर्ट्स' आणि तिचे अध्यक्ष राजेश महेता यांच्यावर केलेल्या मोठ्या कारवाईनंतर अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. शेअर बाजारात गाजलेल्या हर्षद महेता आणि केतन परिख घोटाळ्यापेक्षाही हा अतिप्रचंड...

आता व्हा पूर्वीसारखे तरुण!

वय वाढणे आणि म्हातारपण येणे हा निसर्गाचा नियम आहे, असे आपण मानतो. पण जर कोणी तुम्हाला सांगितले की, आता तुमचे वाढणारे वय थांबवता येऊ शकते, इतकेच नाही तर म्हातारपणाकडून पुन्हा तारुण्याकडे रिव्हर्स प्रवास करणे शक्य आहे, तर तुमचा कदाचित...

बँकांचे कर्ज बुडवणाऱ्यांच्या घरावर आता थेट जप्ती!

बँकांकडून घेतलेले कर्ज वेळेवर न फेडणाऱ्यांसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)ने आता अधिक कठोर पवित्रा घेतला आहे. ५ मे २०२६ रोजी आरबीआयने 'निर्दिष्ट अ-वित्तीय स्थावर जंगम मालमत्ता' म्हणजेच (एसएनएफए) संदर्भात एक नवीन मसुदा (ड्राफ्ट गाईडलाईन्स) जारी केला आहे. यानुसार,...
Skip to content