Homeचिट चॅटजान्हवी मोरे स्मृती...

जान्हवी मोरे स्मृती कॅरम स्पर्धेत स्वरा कदम, ओमकार वडर विजेते

डोंबिवली (पूर्व) येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरे स्मृतिप्रीत्यर्थ १६ वर्षांखालील मुलां-मुलींच्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत अनुक्रमे कोल्हापूरच्या ओमकार वडर आणि रत्नागिरीच्या स्वरा कदमने विजेतेपदाचा मान मिळवला. शास्त्री हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पुणे, कोल्हापूर येथील १००पेक्षा जास्त कॅरमपटू सहभागी झाले होते. दोन्ही गटात प्रथम ८ क्रमांक मिळविणाऱ्या खेळाडूंना रोख रकमेची पारितोषिके, चषक, पदके देण्यात आली. एकूण १८ हजार रुपये रोख रकमेची पारितोषिके देण्यात आली.

मुलांच्या अंतिम सामन्यात कोल्हापूरच्या सुसंस्कार हायस्कूलच्या ओमकार वडरने ठाण्याच्या आय.इ.एस. चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या प्रसाद मानेचा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला. तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत पुण्याच्या आर्यन वर्ल्ड स्कूलच्या आयुष गरुडने ठाण्याच्या आय. इ. एस. चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या नील म्हात्रेचा पराभव केला. मुलींच्या निर्णायक सामन्यात रत्नागिरीच्या आर. बी. शिर्के हायस्कूलघ्या स्वरा कदमने मुंबई उपनगरच्या कनोसा कॉन्व्हेंट हायस्कूलच्या वेदिका पोमेंडकरचा २ सेटमध्ये पराभव केला. तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात मुंबई उपनगरच्या महात्मा गांधी विद्यामंदिराच्या तनया दळवीने सिंधुदूर्ग, सावंतवाडीच्या मुक्ताई अकॅडमीच्या साक्षी रामदूरकरचा पराभव केला.

विजेत्या ओमकार, स्वराला रोख रुपये ३ हजार आणि चषक देऊन गौरविण्यात आले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे यांचे आयोजकांना मोलाचे सहकार्य मिळाले. आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. माजी विश्वविजेते कॅरमपटू योगेश परदेशी, आंतरराष्ट्रीय कॅरमपटू संजय मांडे यांच्या हस्ते स्पर्धेचा बक्षिस समारंभ संपन्न झाला.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content