Homeन्यूज ॲट अ ग्लांसभोंदूबाबा खरात प्रकरणात...

भोंदूबाबा खरात प्रकरणात आता ‘लीगल टायगर’ची एन्ट्री!

विकृत, बलात्कारी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आता न्यायालयीन अवस्थेत पोहोचत असताना, राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या संवेदनशील खटल्यात सरकारची बाजू मांडण्यासाठी नाशिकचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्य गृह विभागाने तीन स्वतंत्र गुन्ह्यांचा एकत्रित तपास एसआयटीकडे सोपवला असून आता त्याच्या न्यायालयीन लढाईची धुरा मिसर यांच्याकडे आली आहे. या नियुक्तीमुळे नाशिकच्या विधिविश्वात एकच चर्चा सुरू झाली आहे, कारण अजय मिसर हे नाव नाशिकच्या गुन्हेगारी खटल्यांच्या इतिहासात वेगळ्याच दबदब्याने परिचित आहे. ‘लीगल टायगर’ म्हणून ते नाशिकमध्ये ओळखले जातात.

ॲड. अजय मिसर हे नाशिकच्या जिल्हा न्यायालय परिसरातील एक जुने व अनुभवी नाव. १९९४पासून नाशिकच्या जुन्या आग्रा रोडवरील मारुती चेम्बर्स, जिल्हा न्यायालय परिसरात त्यांचा व्यवसाय सुरू आहे. तीन दशकांहून अधिक काळाच्या या कारकिर्दीत मिसर यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली. संघटित गुन्हेगारी, मोक्का खटले आणि उच्चस्तरीय गुन्हेगारांचे खटले हे त्यांचे विशेष क्षेत्र. सामान्य वकिलाला भल्याभल्या आरोपींच्या दबावापुढे माघार घ्यावी लागते, पण मिसर यांनी नेमके असे खटले स्वीकारले, जे कठीण आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील होते.

लीगल

मिसर यांच्या कारकिर्दीतील सर्वात उल्लेखनीय प्रकरण म्हणजे आंतरराष्ट्रीय गँगस्टर रवी पुजारीचे खटले. छोटा राजनचा हस्तक आणि कुविख्यात आंतरराष्ट्रीय गँगस्टर रवी पुजारीच्या मुंबई, ठाणे व नाशिक या तीन जिल्ह्यांतील सर्व खटल्यांसाठी राज्य शासनाने अजय मिसर यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती. पुजारीच्या प्रत्यार्पण प्रक्रियेतही मिसर यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. रवी पुजारीसारख्या गँगस्टरवर मोक्का कलमाखाली खटला चालवणे हे सोपे काम नव्हते, कारण आरोपीचे परदेशातून चालणारे नेटवर्क, दबावतंत्र आणि दणकट बचाव पक्ष, या सगळ्यांविरुद्ध सरकारची बाजू लढवणे म्हणजे मिसर यांच्या कायदेशीर कौशल्याची कसोटी होती. त्यात ते यशस्वीपणे खरे उतरले आणि त्यातूनच त्यांची ‘विश्वासार्ह विशेष सरकारी वकील’ ही प्रतिमा घट्ट झाली.

अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमधील निवृत्त खलाशी असून, त्याने ‘कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट’ आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून नाशिकमधील अंधश्रद्ध व कर्मकांडी लोकांच्या वर्तुळात स्वतःची ओळख निर्माण केली. अनेक मोठे राजकारणी, मंत्री व सेलिब्रिटी त्याचे ‘भक्त’ असल्याचे उघड झाले आहे. ३५ वर्षीय महिलेवर नशीले पदार्थ देऊन बलात्कार केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे. पोलिसांच्या छाप्यात ५८ आक्षेपार्ह व्हिडीओ जप्त झाले असून आतापर्यंत एकूण ६ फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत. हे प्रकरण केवळ एका गुन्हेगाराचे नाही, त्याला राजकीय, सामाजिक आणि माध्यमिक परिमाण आहे. अशा गुंतागुंतीच्या खटल्यात सरकारला अशा वकिलाची गरज होती, जो दबावाखाली न झुकता, पुराव्यांची कुशलतेने मांडणी करत न्यायालयात ठाम राहू शकेल. आता आणखी तीन महिलांनी पुढे येत तक्रारी दिल्या असून खरातच्या जमीन व्यवहारांचा तपास आयकर विभागानेही सुरू केला आहे. खटला जसजसा विस्तारत जाईल, तसतसे अजय मिसर यांच्या अनुभवाचा आणि संघटित गुन्हेगारीतील कायदेशीर ज्ञानाचा उपयोग सरकारला अधिकच होणार आहे, हेच या नियुक्तीमागील सरकारचे धोरण असल्याचे विधिवर्तुळातून सांगण्यात येते.

Continue reading

मुंबई-नवी मुंबईतली अनेक प्राप्तीकर कार्यालये भाड्याच्या जागेत!

'आयकर सिंधु'च्या उभारणीपूर्वी विविध परवानग्या मिळवण्यात आणि अतिक्रमणे हटवण्यात आलेल्या अडचणी लक्षात घेता सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या दैनंदिन समस्या सोडवताना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते, याचा आयकर अधिकाऱ्यांनी गांभीर्याने विचार करावा आणि प्रशासन सदैव नागरिककेंद्री राहील याची खात्री करत आपले...

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...
Skip to content