संघकामाचा व्यापक इतिहास समजून घेताना हे पुस्तक वाचणे अनिवार्य ठरते. संघ स्थापनेपासून ते २०२५पर्यंतच्या सर्व तपशीलवार घडामोडी या पुस्तकात वाचायला मळतात. पुस्तकाच्या अनुक्रमणिकेत पाहिले प्रकरण संघ कार्याचा प्रारंभ: विजयादशमी 25 सप्टेंबर 1925 नागपूर, हे असून शेवटचे प्रकरण क्रमांक ७०: शताब्दी वर्षातील संघाची कार्य योजना हे आहे. 70 प्रकरणांमध्ये संघ आणि संघ विचाराने प्रेरित संघटनांचा आढावा घेतला गेला आहे. अगदी 370व्या कलमापर्यंत यात लिहिलेले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ही शंभर वर्षांपूर्वी स्थापन झालेली संघटना आज सर्व जगामध्ये चर्चेचा विषय झाली आहे. १०० वर्षांत सातत्याने या संघटनेचा विस्तार होत गेला. आज सुमारे ८०,००० गावांपर्यंत संघाच्या शाखा किंवा साप्ताहिक मीलनाचे कार्यक्रम सुरू आहेत. देशभरामध्ये असलेल्या संघ स्वयंसेवकांची संख्या दोन ते तीन कोटींच्या घरात आहे. संघ स्वयंसेवकांनी समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी समविचारी ५५ देशव्यापी संस्थांची निर्मिती केली आहे. पावणेदोन लाखांपेक्षा अधिक सेवाकार्ये या सर्व संस्थांमार्फत देशभर चालतात. संघ व समविचारी संस्थांची एकूण सदस्य संख्या १५ ते २० कोटींपर्यंत जाऊन पोहोचते. देशाबाहेर ज्या-ज्या ठिकाणी हिंदू आहेत, त्या ठिकाणी संघ अथवा संघाच्या समविचारी संस्थांनी काही ना काही रचनात्मक काम सुरू केलेले आहे. त्या-त्या ठिकाणी या संघटना हिंदू समाजाच्या आधार बनून राहिल्या आहेत.

आजपर्यंत दोन संघप्रचारक देशाचे पंतप्रधान झाले. अनेक प्रांतांमध्ये संघस्वयंसेवक मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचले, राष्ट्रपती झाले. राज्यपाल, मंत्री, आमदार व खासदार झालेल्यांची संख्या कित्येक हजारांत आहे. देशापुढील कोणत्याही समस्येचे निराकरण करताना त्यासंबंधी संघाचा विचार काय आहे, याची प्राधान्याने दखल घेतली जाते. हा बदल कसा होत गेला? संघ विविध रूपांमध्ये प्रकट झाला व समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांतील समस्या सोडवतानाच त्या-त्या क्षेत्रात समाजसंघटनेचे कामही विस्तारले. संघ व संघ परिवार, देशाच्या इतिहासातील हे एक सोन्याचे पान म्हणावे लागेल. ते सोनेरी पान उलगडून आपल्यासमोर या पुस्तकात ठेवले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ: शताब्दीची वाटचाल
लेखक: डॉ. शरद कुंटे
पृष्ठे: २९५ मूल्य: ४५०/-
सवलतमूल्य: ३९०/- टपाल खर्च: ५०/-
एकूण: ४४०/- घरपोच
पुस्तक खरेदीसाठी संपर्क: ग्रंथसंवाद वितरण (8383888148, 9702070955)

