Homeचिट चॅटउद्यापासून कुर्ल्यात रंगणार...

उद्यापासून कुर्ल्यात रंगणार शिवछत्रपती करंडक कबड्डी

शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून मुंबईत कुर्ला पश्चिम स्टेशनजवळील गांधी मैदानात जयशंकर चौक क्रीडा मंडळ आणि गौरीशंकर क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने उद्या आठ व नऊ मार्च रोजी सायंकाळी जिल्हास्तरीय शिवछत्रपती करंडक कबड्डी स्पर्धा 2025चे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेमध्ये प्रथम श्रेणी पुरुष गटात अंबिका सेवा मंडळ कुर्ला, लाल बत्ती क्रीडा मंडळ विक्रोळी, भानवे अकॅडमी चुनाभट्टी, टागोर नगर क्रीडा मंडळ विक्रोळी, शितलादेवी स्पोर्ट्स क्लब चेंबूर, शूर संभाजी क्रीडा मंडळ कुर्ला, श्री साई स्पोर्ट सेंटर कांजूरमार्ग हे दिग्गज संघ खेळणार आहेत तर द्वितीय श्रेणी पुरुष गटात हनुमान क्रीडा मंडळ कुर्ला, पंढरीनाथ सेवा मंडळ चुनाभट्टी, जाणता राजा क्रीडा मंडळ कुर्ला, छावा बॉईज कुर्ला, मिलिंद सेवा मंडळ चुनाभट्टी, भरारी स्पोर्ट्स क्लब चुनाभट्टी, नवजवान क्रीडा मंडळ चुनाभट्टी, लोकमान्य शिक्षण संस्था चेंबूर ह्या संघांमध्ये जेतेपदासाठी चुरस पाहयला मिळेल. स्पधेत रोख रक्कमेची पारितोषिके आहेत. तसेच वैयक्तिक सर्वोत्तम खेळाडूंनादेखील खास बक्षिसे देण्यात येतील.

Continue reading

देशभरात साठेबाजांविरूद्ध अत्यावश्यक सेवा कायदा लागू!

आखातात सुरू असलेल्या इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धामुळे निर्माण झालेल्या तेल आणि गॅस संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने संपूर्ण देशात अत्यावश्याक वस्तू कायदा लागू केला आहे. अत्यावश्यक सेवा कायदा अधिनियम १९५५, हा कायदा लागू केल्यानंतर घराघरात लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तूंच्या साठेबाजांविरोधात कठोर कारवाई केली...

पापरी चक्रवर्ती यांना उद्या देणार गानसरस्वती पुरस्कार

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विदुषी पापरी चक्रवर्ती यांना विदुषी श्रुति सडोलीकर-काटकर यांच्या हस्ते यंदाचा गानसरस्वती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा किशोरी अमोणकर यांचे शिष्य डॉ. अरुण द्रविड यांच्या सहकार्याने देण्यात येतो. हे वितरण उद्या, रविवारी...

श्री गणेश आखाड्यात मान्यवरांचा गौरव

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सौजन्याने व मीरा-भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाड्याच्यावतीने मीरा-भाईंदरच्या महापौर डिंपल मेहता, उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील, नगरसेवक तसेच विविध स्पर्धांत पदक पटकावलेल्या आखाड्याच्या कुस्तीगिरांचा गौरव सोहळा उत्साही वातावरणात नुकताच संपन्न झाला. सर्वांना फेटे बांधून, शाल-श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन...
Skip to content