Homeकल्चर +जेव्हा पपेट्सने गाजवला...

जेव्हा पपेट्सने गाजवला कोल्ड प्लेसोबत रंगमंच!

एक स्वप्न सत्यात उतरलं, जेव्हा शब्दभ्रमकार व बाहुलीकार सत्यजित रामदास पाध्ये आणि त्यांच्या प्रतिभावान पपेटियर टीमने- कौस्तुभ, सुषांत आणि कैलाश यांनी प्रसिद्ध कोल्ड प्ले बँडसोबत भारत दौऱ्यात मंचावर धमाकेदार परफॉर्मन्स केला! कोल्ड प्लेच्या टीमने खास सत्यजित आणि त्यांच्या टीमला ह्या शोसाठी निवडले. क्रिस मार्टिन आणि त्यांच्या बँडसोबत “गुड फिलिंग्स” या गाण्यावर सत्यजित आणि त्याच्या टीमने अप्रतिम परफॉर्मन्स सादर केला. संगीत आणि पपेट्रीचा अद्भुत संगम अनुभवायला मिळाला.

प्रसिद्ध जिम हेनसन कंपनीतील अमेरिकन पपेटियर निकॉलेट आणि ड्रू यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रशिक्षणामुळे, सत्यजित आणि त्यांच्या टीमने ५ ऐतिहासिक शोमध्ये आपल्या कलागुणांनी जादू निर्माण केली आणि त्यात हा क्षणही अविस्मरणीय ठरला.

शब्दभ्रमकार व बाहुलीकार सत्यजित म्हणाला की, या अविस्मरणीय प्रवासाचा भाग बनवल्याबद्दल कोल्ड प्लेला मनःपूर्वक धन्यवाद आणि आमच्यावर प्रेम आणि पाठिंबा दर्शवणाऱ्या प्रत्येक चाहत्याचे मनःपूर्वक आभार. तुमच्याशिवाय हे शक्यच नव्हतं. आम्हाला जगातील सर्वात मोठ्या कोल्ड प्ले कॉन्सर्टचा भाग बनविल्याबद्दल धन्यवाद..

Continue reading

पंतप्रधान मोदी सेशेल्सच्या सर्वोच्च बहुमानाने सन्मानित

व्हिक्टोरिया (सेशेल्स) येथे एका विशेष सोहळ्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज सेशेल्सचे अध्यक्ष डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्या हस्ते ‘गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन’ हा पहिला सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. पंतप्रधानांच्या पर्यावरणपूरक नेतृत्त्वासाठी, विकसनशील देशांच्या हितासाठी केलेले प्रयत्न, सागरी...

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...
Skip to content