Homeहेल्थ इज वेल्थएन. जे. वाडिया...

एन. जे. वाडिया आरोग्य केंद्र व दवाखाना नवीन जागेत स्थलांतरित

मुंबई महापालिकेचे ‘के पश्चिम’ विभागाच्या अखत्यारितील एन. जे. वाडिया आरोग्य केंद्र व दवाखान्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. दुरुस्तीच्या कारणास्तव हे आरोग्य केंद्र व दवाखाना तात्पुरत्या स्वरुपात खालील नमूद नवीन जागी स्थलांतरित करण्यात आला आहे.

स्थलांतराचा पत्ताः

एन. जे. वाडिया आरोग्य केंद्र व दवाखाना,

बी. एम. सी. जिमखाना,

गिलबर्ट हिल, सागर सिटी शाळेजवळ,

अंधेरी (पश्चिम), मुंबई.

तरी नागरिकांनी या आरोग्‍य केंद्र आणि दवाखाना सुविधांचा स्थलांतरीत ठिकाणी लाभ घ्‍यावा, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

Continue reading

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...

इराणवर हल्ला करण्यास अमेरिकी सेनेटची मनाई!

गेल्या जवळपास चार महिन्यांपासून पश्चिम आशियाला अशांतेच्या गर्तेत लोटणाऱ्या अमेरिका-इराण संघर्षात एक मोठी घडामोडी समोर आली आहे. १७ जून रोजी स्वाक्षरी झालेल्या सामंजस्य करारानंतर या दोन्ही देशांमध्ये युद्ध थांबले असले, तरी आता दोन्ही देशांमध्ये अटी आणि नियमांवरून पुन्हा एकदा...
Skip to content