Homeचिट चॅटमनोरा बॅडमिंटनः विहा,...

मनोरा बॅडमिंटनः विहा, अद्विक, केशवी, सयुज्व‌, सहाना, आयांश विजेते

मुंबईतल्या किंग सर्कल येथील नॉर्थ इंडियन असोसिएशनच्या बॅडमिंटन कोर्टवर आयोजित करण्यात आलेल्या मनोरा बॅडमिंटन अकादमीच्या स्पर्धेत विहा झालबा, अद्विक तिवारी, केशवी महेश्वरी, सयुज्व रजपूत, सहाना प्रभुगावकर, आयांश जैन, सहज कदम यांनी आपापल्या वयोगटात विजेतेपदाचा मान मिळवला. सहाना प्रभुगावकरने स्पर्धेत दुहेरी मुकुट संपादन केला. तिने १३ आणि १५ वर्षांखालील मुलींच्या दोन्ही गटात जेतेपदाचा मान मिळवला.

ही अकादमीची १२०वी स्पर्धा होती. या स्पर्धेत मुंबई, नवी मुंबई, नाशिक, पालघर, कुडाळ, वसई, विरार येथील १५०पेक्षा जास्त खेळाडू सहभागी झाले होते. नॉर्थ इंडियन असोसिएशनचे राजन शाह, केतन पंड्या आणि मनोहर गोडसे यांच्या हस्ते स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ पार पडला.नॉर्थ इंडियन‌ असोसिएशनच्या हिरेन छेडा यांनीदेखील स्पर्धेला भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

स्पर्धेचा अंतिम निकाल:

मुले- ९ वर्षांखालील: विहा झालबा वि.वि. यांती गावडे, ११ वर्षांखालील: केशवी महेश्वरी वि.वि. सुमेधा मोरे, १३ वर्षांखालील: सहाना प्रभुगावकर वि.वि. केशवी महेश्वरी, १५ वर्षांखालील: सहाना प्रभुगावकर वि.वि. केश्वी उचील.

मुले- ९ वर्षांखालील: अद्विक तिवारी वि. वि. कबीर पारेख, ११ वर्षांखालील: सयुज्व रजपूत वि. वि. अद्विक तिवारी, १३ वर्षांखालील: आयांश जैन वि. वि. अधरीत सिंग,
१५ वर्षांखालील: सहज कदम वि. वि. रायन शाह.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

.. आणि रविदादांनी पुसले चिल्ड्रेन होममधल्या मुलांचे ओघळणारे अश्रू

तुम्हाला आठवतो का अभिनेत्ता संजीव कुमार आणि हे गीत...! 'आया रे खिलौनेवाला, खेल खिलौने लेके आया रे.."! आया रे! तुम कहा... गये हो... मेरे प्यारो... असाच एक अनुभव दिवाळी २०२६ फराळच्या निमित्ताने आला. त्या सुपरहिट बचपन चित्रपटात संजीव कुमार...

ईक्षा देसाईंचे वयाच्या आठव्या वर्षींचे स्वप्न साकार! झाल्या ‘मिसेस इंडिया’!!

मुंबईतल्या अशोकवन, दहिसर (पूर्व) येथील मानसशास्त्रज्ञ ईक्षा देसाई यांनी वयाच्या आठव्या वर्षी पाहिलेले स्वप्न अखेर सत्यात उतरवले आहे. द इंटरनॅशनल ग्लॅमर प्रोजेक्ट 'मिसेस इंडिया विजेती २०२६' म्हणून त्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबासह समाजात आनंदाची लाट उसळली आहे. यासोबतच...

लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना ३० नोव्हेंबरला?

महिला आरक्षणाला जोडून देशातल्या लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना करण्यासाठी आणि ही प्रक्रिया २०२९च्या लोकसभा निवडणुकीआधी पूर्ण करण्यासाठी येत्या ३० नोव्हेंबरपासून संसदेचे चार दिवसांचे अधिवेशन होणार असल्याचे समजते. येत्या ३० नोव्हेंबरला लोकसभेचे एक दिवसाचे अधिवेशन होईल तर दोन डिसेंबरला राज्यसभेत एका...
Skip to content