Homeकल्चर +पं. कान्हेरे, पं....

पं. कान्हेरे, पं. द्रविड, संजय मोने आदींना ‘दादर-माटुंगा’ पुरस्कार!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचे वार्षिक पुरस्कार २०२५ जाहीर करण्यात आले असून येत्या रविवारी, २६ जानेवारीला सकाळी दहा वाजता केंद्रात होणाऱ्या शानदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्याचे वितरण करण्यात येणार आहे. या पुरस्कारप्राप्त मान्यवरांमध्ये पं. विश्वनाथ कान्हेरे, पं. अरुण द्रविड, संजय मोने, चिन्मयी सुर्वे आदींचा समावेश आहे.

जाहीर करण्यात आलेले पुरस्कार पुढीलप्रमाणे:

जव्हेरी संगीत शिक्षक पुरस्कार- पं. विश्वनाथ कान्हेरे

सोमाणी ज्येष्ठ कलावंत- पं. अरूण द्रविड

ज्येष्ठ रंगकर्मी- संजय मोने

नाट्यदिग्दर्शक- डॉ. विवेक बेळे

समीक्षक- भालचंद्र कुबल

आईची भूमिका- चिन्मयी सुर्वे

संगीत विशारद- ऋत्विक आठवले, श्रृती पोटे

संगीत नाटकातील अभिनेत्री-  सावनी शेवडे

याचवेळी गाथा सप्तशतिपासून आजपर्यंत बदलत गेलेली भाषेची रुपे गाणे व अभिवाचन यातून उलगडून दाखवणारा `इये मराठीचिये नगरी’ हा कार्यक्रमदेखील होणार आहे. ‘इये मराठीचिये नगरी’.. संत ज्ञानेश्वरमहाराजांनी मराठी भाषेला नगरीची उपमा दिली आहे. त्याची संकल्पना, संहिता, बांधणी व सहभाग डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांचा आहे. गिरीश दातार व गौरी देशपांडे यावेळी अभिवाचन करतील तर नेहा देशपांडे व समीहन सहस्त्रबुद्धे गायन करतील.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content