Tuesday, April 15, 2025
Homeएनसर्कलVLSRSAMची सलग दुसरी यशस्वी...

VLSRSAMची सलग दुसरी यशस्वी उड्डाण चाचणी यशस्वी

डीआरडीओ आणि भारतीय नौदलाची ओदिशाच्या किनारपट्टीवरून व्हर्टिकल लॉन्च शॉर्ट रेंज सरफेस टू एअर मिसाईल, VLSRSAMची सलग दुसरी यशस्वी उड्डाण चाचणी केली.

संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) आणि भारतीय नौदलाने, VLSRSAMच्या एकापाठोपाठ एक यशस्वी उड्डाण चाचण्या केल्या आहेत. सलग दुसरी चाचणी काल, 13 सप्टेंबरला ओदिशातील चंडीपूर येथील एकात्मिक चाचणी तळावरून घेण्यात आली. या क्षेपणास्त्राने अत्यंत कमी उंचीवरून उडणाऱ्या आणि रडारवर दिसू न येणाऱ्या अतिवेगवान हवाई लक्ष्यावर हल्ला केला आणि  लक्ष्य निष्प्रभ करण्याची अचूकता आणि क्षमतेचे दर्शन घडवले.

त्याआधी 12 सप्टेंबरला पहिली चाचणी घेण्यात आली तेव्हाही VLSRSAM क्षेपणास्त्राने कमी उंचीवरील लक्ष्याचा भेद यशस्वीपणे पूर्ण केला. सलग घेण्यात आलेल्या या चाचण्या केवळ शस्त्रप्रणालीची विश्वासार्हता दर्शवत नाहीत तर प्रणालीतील विविध घटकांमध्ये अलीकडील काळात करण्यात आलेल्या सुधारणादेखील प्रमाणित करतात.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या यशस्वी उड्डाण चाचण्यांसाठी डीआरडीओ, भारतीय नौदल आणि सर्व संबंधित चमूंचे कौतुक केले. आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या क्षेपणास्त्रामुळे सशस्त्र दलांना  तंत्रज्ञानाच्या बाबतीत आणखी चालना मिळेल, असे ते म्हणाले. संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर कामत यांनीही VLSRSAM प्रणालीच्या उड्डाण चाचण्यांमध्ये सहभागी असलेल्या चमूचे अभिनंदन केले.

Continue reading

दादर-माटुंगा केंद्रात रंगला संगीत नाट्यमहोत्सव

संगीत रंगभूमीच्या वैभवशाली कालखंडाची आठवण करून देणारा संगीत-नाट्य महोत्सव मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात नुकताच साजरा झाला. संगीत नाटकांना चांगले दिवस यावेत यासाठी संस्था गेली १६ वर्षे हा महोत्सव आयोजित करत आहे. संगीत अमृतवेल हे खल्वायन, रत्नागिरी निर्मित, आणि डॉ. श्रीकृष्ण जोशी लिखित, मनोहर...

राज्य सरकारी अधिकाऱ्यांचे नेते ग. दि. कुलथे यांचे निधन

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे यांचे काल, सोमवारी रात्री नऊ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने नवी मुंबईच्या नेरूळ येथील राहत्या घरी निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. राज्य सरकारी अधिकाऱ्यांच्या संघटनेचे मार्गदर्शक म्हणून...

‘मिशन मुंबई’च्या चित्रिकरणाला सुरुवात

ॲक्शन चित्रपटाची क्रेझ साउथ चित्रपटांसोबतच बॉलिवूडमध्येही असते. आता ती मराठी चित्रपटात पाहायला मिळेल. “मिशन मुंबई” हा शोध, थरारक आणि ॲक्शन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्याच्या घडीला या चित्रपटाला एक्शनपट म्हणता येईल. कारण, यामध्ये सुमधूर संगीतासोबत एक्शनचा भडीमार...
Skip to content