Homeपब्लिक फिगरदेशावरचे संकट आजही...

देशावरचे संकट आजही कायम!

देशावरचे संकट अद्याप गेलेले नाही. लोकशाहीला अजूनही धोका कायम आहे. राज्याचे चित्र बदलायचे असेल तर सध्याचे सरकार बदलल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे ही लढाई एकजुटीने लढूया, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी आज मुंबईतल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात केले.

काल आपण स्वातंत्र्यदिवस साजरा केला. उद्याची महाराष्ट्राची दिशा काय राहणार आहे? महाराष्ट्रावर जे काही संकट आहे त्यातून राज्याची सुटका कशी करता येईल हे या सभेच्या  माध्यमातून पोहोचले पाहिजे. लोकसभेला आपण संविधान बदलण्याबाबतची भूमिका मांडली होती. संविधानावरील संकट अजूनही गेलेले नाही. कारण आताच्या सरकारच्या विचारधारेला संविधानाची अडचण आहे, असे ते म्हणाले.

संकट

संसदेच्या नुकत्याच झालेल्या अधिवेशनात पंतप्रधान एक दिवसही सभागृहात आले नाहीत. कालच्या १५ ऑगस्टच्या कार्यक्रमात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना मागे  बसवले होते. मी विरोधी पक्षनेता होतो त्यावेळी माझी आसनव्यवस्था कॅबिनेट मंत्र्यांच्या ओळीत होती. आज राहुल गांधी यांची प्रतिष्ठा गेली. डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना सुषमा स्वराज यांना पहिल्या रांगेत बसवले होते. विरोधी पक्षनेता ही संस्था असते. तिचा मान ठेवायचा असतो, असेही पवार म्हणाले. रस्त्यावर आंदोलन करणाऱ्याबाबत एक कायदा आणायचा सरकारचा प्रयत्न आपण हाणून पाडला आहे. या कायद्यामुळे रस्त्यावर आंदोलन करणाऱ्या व्यक्तीला 5 ते 7 वर्षे तुरुंगात टाकण्याचे प्रयोजन होते. आम्ही तिघेही सन्मानाने सर्वांना सामावून घेऊन एक चांगले सरकार आणू. ही लढाई एकजुटीने लढू, असेही त्यांनी सांगितले.

Continue reading

कार-बाईक मालकांसाठी खुशखबर; नव्या वाहनांसाठी ३ वर्षांची पीयूसी

कार आणि बाईकच्या मालकांना आता दरवर्षी प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) घेण्याची झंझट संपणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने १३ नोव्हेंबर २०२६ रोजी अधिसूचित केलेले केंद्रीय मोटार वाहन (१६वे संशोधन) नियम, २०२६ आता राजपत्रात प्रसिद्ध झाल्याने लागू झाले...

भरत सावंतने जिंकली नलावडे स्मृती शालेय कॅरम स्पर्धा

मुंबईतल्या आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी, शशिकलाताई फौंडेशन व अविनाश नलावडे स्पोर्ट्सतर्फे बालदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेली‌ कॅरमप्रेमी प्रल्हाद नलावडे स्मृती चषक शालेय कॅरम स्पर्धा आरपीडी हायस्कूल-सावंतवाडीच्या भरत सावंतने जिंकली. निर्णायक बोर्डाच्या अगोदर ११-७ अशी आघाडी घेणाऱ्या द्वितीय मानांकित प्रसन्न गोळेला भरत...

१९७७ ते २००८… ३१ वर्षांच्या आठवणी तराळल्या एकाच छताखाली!

दिवाळी म्हटली की दिव्यांची आरास आणि फराळाचा सुगंध, पण यंदाची दिवाळी वसंत सहकारी साखर कारखाना, वनकोठे - वसाकाच्या (जळगाव जिल्हा, एरंडोल तालुका) परिवारासाठी वेगळीच ठरली. ९ आणि १० नोव्हेंबर रोजी सन १९७७ ते २००८ या कालावधीतील जवळपास १५० मित्र...
Skip to content