Homeमुंबई स्पेशल'मुंबई पदवीधर'साठी शिवसेनेकडून...

‘मुंबई पदवीधर’साठी शिवसेनेकडून डॉ. दीपक सावंत

महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघातून आज शिवसेनेचे अधिकृत उमेदवार डॉ. दीपक सावंत यांनी आपला उमेदवारीअर्ज दाखल केला. यावेळी बाळासाहेबांच्या विचारांचे शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

सकाळी १०.३० वाजता मुंबईतल्या विलेपार्ले पूर्व येथील पार्लेश्वर मंदिरात आशीर्वाद घेऊन उमेदवारीअर्ज भरण्यासाठी डॉ. सावंत शिवसैनिकांसह कोकण विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण भवन, नवी मुंबई

दीपक सावंत

येथे पोहोचले. कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडे डॉ. सावंत यांनी उमेदवारीअर्ज भरला.

२६ जून २०२४ रोजी महारष्ट्र विधान परिषदेसाठी मुंबई पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत डॉ. सावंत शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री म्हणून डॉ. सावंत यांचं काम आपण पाहिलं आहे. ते यापूर्वी दोन वेळा पदवीधर मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने निवडून आले आहेत. त्यापूर्वी विधानसभा सदस्यातून ते निवडून आले आहेत.

Continue reading

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...

८ जूनपासून पाऊस कोकणातच!

देशातील मान्सूनची सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली असल्याचे, खासगी हवामान एजन्सी स्कायमेटचे संचालक जी. पी. शर्मा यांनी म्हटले आहे. मुळातच यंदा मान्सूनचे आगमन उशिराने झाले असून, सुरुवातीचे काही दिवस प्रगती केल्यानंतर गेल्या एका आठवड्यापासून तो पूर्णपणे थबकला आहे. ८...

आता फक्त २०० रुपयात करा कुटुंबातच होणाऱ्या वाटणीची मोजणी!

राज्यशासनाने सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत जमीन मोजणीच्या शुल्क आणि प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेल्या नव्या निर्णयानुसार, आता कुटुंबातच होणाऱ्या संमतीच्या किंवा कोर्टाच्या वाटणीची मोजणी अवघ्या २०० रुपये प्रति पोटहिस्सा या नाममात्र शुल्कात केली...
Skip to content