Homeचिट चॅटउद्यापासून बोरीवलीत घ्या...

उद्यापासून बोरीवलीत घ्या साहित्यिक मेजवानी

मुंबई, महाराष्ट्रातील लोकशाहीचा उत्सव संपताच उद्यापासून म्हणजेच मंगळवार, २१ मे २०२४पासून मुंबईतल्या बोरीवलीतल्या जय महाराष्ट्र नगर येथे ही वसंत व्याख्यानमाला सुरु होत आहे. ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या ४१ वर्षांपासून सुरु असलेल्या या वसंत व्याख्यानमालेचे यंदा ४२वे वर्ष आहे.

एक संध्याकाळ शाहीरांसमवेत या नामाभिधानाने वसंत व्याख्यानमालेचे मंगळवारी, २१ मे २०२४ रोजी सायंकाळी पहिले पुष्प गुंफताना लोककलेचे गाढे अभ्यासक, मुंबई विद्यापीठाच्या शाहीर अमर शेख अध्यासनाचे प्रमुख डॉ. ‌गणेश चंदनशिवे आणि त्यांचे सहकारी पोवाडे सादर करतील. बुधवार, २२ मे २०२४ रोजी ‘मी भारतीय’ या विषयावर पुण्याचे रवींद्र देवधर हे दीर्घांक सादर करुन आपण सारे भारतीय आहोत ही त्यांची संकल्पना मांडतील. गुरुवार, २३ मे २०२४ रोजी चॉकलेट हिरो देव आनंद, ही संकल्पना घेऊन ख्यातनाम चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर देव आनंद यांच्या सदाबहार अभिनेत्याच्या आठवणी, किस्से आपल्या खुमासदार शैलीत रसिक प्रेक्षकांसमोर सादर करतील तर संगीत संयोजक संतोष पिसाट आणि प्रमोद कुंभार हे देव आनंद यांच्या गाजलेल्या चित्रपटांतील निवडक गाणी सादर करतील.

शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी आपल्या आयुष्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगड या राजधानीवर तब्बल पाचशे वेळा जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राचा खराखुरा परिचय शिवभक्तांना करुन देत एक ऐतिहासिक विक्रम पूर्ण केला आहे. या त्यांच्या रायगड दर्शन @५००निमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी शुक्रवार, २४ मे २०२४ रोजी त्यांच्या विशेष प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.

विजय वैद्य आणि प्रा. नयना रेगे यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा ही वसंत व्याख्यानमाला ४२ वर्षांची होत आहे. हे औचित्य साधून शनिवार, २५ मे २०२४ रोजी प्रख्यात सुसंवादिनी मंगला खाडिलकर या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी रसिक श्रोत्यांशी थेट संवाद साधतील.

रोज सायंकाळी ७.३० वाजता ही वसंत व्याख्यानमाला सुरु होणार असून रसिक प्रेक्षक, श्रोतृवृंदांनी वेळेपूर्वी आपापले स्थान ग्रहण करुन या बौद्धिक मेजवानीचा यथायोग्य लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content