Homeकल्चर +धाराशिवमध्ये संत गोरोबाकाका...

धाराशिवमध्ये संत गोरोबाकाका साहित्य संमेलन संपन्न 

धाराशिवच्या संत गोरोबाकाका सेवा समितीतर्फे बार्शी नाका येथील जिजाऊ चौकावरील स्वयंवर मंगल कार्यालयात श्री संत गोरोबाकाका संगीतमय चरित्रकथेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या चरित्रकथेमध्ये एक एकदिवसीय संत गोरोबाकाका साहित्य संमेलनही आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाची संकल्पना कविता पुदाले यांची होती. आपल्या जिल्हयाचा अभिमान वैराग्य महामेरू संत श्री गोराबाकाका यांच्या चरित्राचा आणि साहित्याचा प्रसार होण्याचा प्रमुख उद्देश घेऊन ह्या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

या संत साहित्य संमेलनाचे उद्घाटन ह.भ.प. गहिनीनाथ महाराज, औसेकर (अध्यक्ष, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर) यांच्या हस्ते झाले. संमेलनाध्यक्ष ह.भ.प. दीपक महाराज जेवणे, पुणे (संत साहित्याचे गाढे अभ्यासक) संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ह.भ.प. अॅड. पांडुरंग महाराज लोमटे, डॉ. अभय शहापुरकर, नितीन तावडे (अध्यक्ष, म.सा.प. धाराशिव), ह.भ.प. पद्मनाभ व्यास महाराज, कमल नलावडे (ज्येष्ठ लेखिका, धाराशिव) या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रा. कृष्णा तेरकर तर आभार डॉ. रुपेशकुमार जावळे ह्यांनी मानले.

साहित्य संमेलनाच्या पहिल्या सत्राची सुरूवात संत गोरोबाकाका यांचे भक्तिमय जीवन यावरील परिसंवादाने झाली. या परिसंवादाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सतिश कदम (छ. शिवाजी महाराज चरित्र साधने प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासन) तर वक्ते म्हणून ह.भ.प. प्रा. एकनाथ महाराज मेंढेकर, मा. प्राचार्य डॉ. श्रुती वडगबाळकर, ह.भ.प. प्रसाद महाराज माटे आळंदी हे उपस्थित होते. परिसंवादाचे सूत्रसंचालन प्रा. पल्लवी क्षीरसागर तर आभार मा. प्रा. सोमनाथ लांडगे यांनी मानले.

दुसर्‍या सत्रात कविसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून शब्दप्रभू माधव पवार, सोलापूर तर प्रमुख उपस्थिती म्हणून अरुण रोडे (अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक महासंघ, महाराष्ट्र राज्य), ह.भ.प. भारत महाराज कोकाटे, मिलिंद जोशी (माजी अध्यक्ष, काव्यशिल्प, पुणे), राजेंद्र अत्रे, युवराज नळे, मधुकर हुजरे, डॉ. अरविंद हंगरगेकर, डॉ. रुपेशकुमार जावळे, बाळू घेवारे, सुनील उकंडे, कविता पुदाले हे उपस्थित होते. याच कार्यक्रमात शांता ठाकूर, गीता पुदाले, रुपाली डुकरे, कविता पुदाले आणि मीरा महाबोले यांनी भारूड सादर केले.

निमंत्रक कवी / कवयित्री म्हणून बाळ पाटील, शाम नवले, कृष्णा साळुंके, रत्नाकर उपासे, प्रा. नरेंद्र गुंडेली, हणमंत पडवळ, वंदना कुलकर्णी, संजय घोंगडे, अॅड. शुभदा पोतदार, अंजली बुरगुटे, मनिषा पोतदार, सुवर्णा शिनगारे, सरिता उपासे, सुरभी भोजने, जयश्री घोडके, माधुरी घोडके, अलका सपकाळ, अनुराधा देवळे, के. पी. बिराजदार, हिराचंद देशमाने, मधुकर गुरव, राधिका मिटकर आणि उषाताई लांडगे कवी कवयित्री यांनी आपल्या रचना सादर केल्या. या कविसंमेलनाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. अरविंद हंगरगेकर आणि माधुरी घोडके यांनी तर आभारप्रदर्शन कविता पुदाले यांनी मानले.

समारोप सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून ह.भ.प. दीपक महाराज खरात (सकल संत चरित्रकथा निरुपणकार, श्रीक्षेत्र तेर) उपस्थित होते. श्रीकृष्ण देशमुख प्रितमभैया बागल, अॅड. रविंद्र मोहिते राजाराम जगताप आणि राजाभाऊ लोहार यावेळी उपस्थित होते.

समारोप सत्राचे सूत्रसंचालन ए. डी. राऊत यांनी तर आभारप्रदर्शन शामराव दहिटणकर यांनी केले. शामराव दहिटणकर अध्यक्ष, संत गोरोबाकाका साहित्य संमेलन, धाराशिव, श्रीकृष्ण देशमुख कार्यवाह, ह.भ.प. डॉ. ईश्वर महाराज कुंभार, स्वागताध्यक्ष प्रा. सोमनाथ लांडगे सचिव, कविता पुदाले, उपाध्यक्षा आणि सदस्य अॅड. रविंद्र मोहिते, अॅड. बाबूराव हंद्राळे, पुणे, डॉ. शिवाजी सोनार, संदिपान कुंभार, बाळू घेवारे, रामदास कुंभार आणि डॉ. रूपशेकुमार जावळे, डॉ. अरविंद हंगरगेकर, डॉ. कृष्णा तेरकर या सर्वांनी संत साहित्य संमेलन यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content