Homeकल्चर +दर्दी रसिकांच्या गर्दीने...

दर्दी रसिकांच्या गर्दीने गाजला संगीतनाट्य महोत्सव

संगीत रंगभूमीच्या वैभवशाली कालखंडाची आठवण करून देणारा संगीतनाट्य महोत्सव मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात नुकताच साजरा झाला.

संगीत नाटकांना चांगले दिवस यावेत यासाठी ही संस्था गेली १५ वर्षे हा महोत्सव आयोजित करत आहे. साहित्य संघाचे संगीत माऊली, गंधर्वभूषण जयराम शिलेदार नाट्यसंस्थेचे संगीत सुवर्णतुला व कलाद्वयी, पुणे या संस्थेचे संगीत मत्स्यगंधा ही नाटके यावेळच्या महोत्सवात सादर करण्यात आली. रसिकांचा या महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला. हा महोत्सव विमल ट्रस्ट आणि दिलीप काटदरे यांनी सहप्रायोजित केला होता.

संगीत माऊली हे नवीन नाटक असून ज्ञानेश्वरांचे आईवडील विठ्ठलपंत आणि रूक्मिणीबाई यांच्या आयुष्याची आणि त्यागाची कहाणी सांगण्यात आली आहे. लेखन, दिग्दर्शन व संगीत या बाजू नेटक्या आहेत. नवीन कलाकारांनी अभिनयाची बाजूही चांगली सांभाळली. संगीत सुवर्णतुला आणि संगीत मत्स्यगंधा ह्या मुळात लोकप्रिय असलेल्या नाटकांनी तर बहार केली. जुने जाणते कलाकार, अप्रतिम गाणी यांनी दोन्ही प्रयोग चांगलेच रंगले. गाण्यांना वन्स मोअरही मिळाले.

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content