Homeपब्लिक फिगरदेशाच्या भवितव्यासाठी ही...

देशाच्या भवितव्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची..

यंदाची निवडणूक ही देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. ही निवडणूक विकासपुरूष नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी भाजपा उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा. विकसित भारताचा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी नरेंद्र मोदींच्या पारड्यात मोठ्या संख्येने मतांचे दान टाका, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

सोलापूर मतदारसंघातील भाजपा-महायुतीचे उमेदवार आ. राम सातपुते व माढा मतदारसंघातील उमेदवार खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा उमेदवारीअर्ज दाखल करताना झालेल्या सभेत फडणवीस बोलत होते. यावेळी खा. जयसिद्धेश्वर महास्वामी, आ. सुभाष देशमुख, आ. विजयकुमार देशमुख, आ. बबन शिंदे, आ. जयकुमार गोरे, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. संजय शिंदे, आ. समाधान अवताडे, आ. यशवंत माने, आ. शहाजीबापू पाटील, माजी आ. प्रशांत परिचारक आदी मंचावर उपस्थित होते.

एनडीए म्हणजे विकासाच्या गाडीचे पॉवरफुल इंजिन असून त्याला आमच्या घटक पक्षांचे डबे जोडले गेले आहेत. या प्रत्येक डब्यात दुर्बल, वंचित, आदिवासी, अल्पसंख्याक, महिला, शेतकरी या सर्वांसाठी जागा आहे. मात्र याउलट विरोधकांकडे 26 पक्ष असून प्रत्येक नेताच स्वत:ला इंजिन समजतो. त्यामुळेच त्यांच्या इंजिनाला डबेच नसल्याने त्यात सर्वसामान्यांना जागाच नाही. त्या इंजिनात केवळ त्यांचा परिवार बसणार आहे, अशी टिप्पणी त्यांनी केली. कमळाचे बटन दाबले की मत उमेदवाराला नव्हे तर थेट मोदींना जाईल. विरोधकांचे मात्र प्रत्येक मत राहुल गांधींना जाणार आहे हेही फडणवीस यांनी अधोरेखित केले.

फडणवीस यांनी मोदी सरकारच्या मागच्या 10 वर्षांतील विकास योजनांची जंत्रीच यावेळी सादर केली. 25 कोटी जनता दारिद्र्य् रेषेच्या वर, 20 कोटी लोकांना पक्की घरे, 50 कोटी जनतेसाठी शौचालये, 55 कोटींना गॅस कनेक्शन्स, 60 कोटी लोकांच्या घरात पिण्याचे पाणी, 55 कोटी जनतेला आयुष्मान योजनेमुळे 5 लाखांपर्यंत मोफत उपचार हे सगळे स्वप्नवत वाटणारे कार्य मोदी सरकारने करून दाखवले. कोट्यवधी लाभार्थींचे आशीर्वाद आज मोदींच्या पाठीशी असल्याने मोदींच्या केसालाही धक्का लागणार नाही असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला.

मागच्या 10 वर्षांत देशाची अर्थव्यवस्था मोदी सरकारमुळे जगातील सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था बनली आहे. अर्थव्यवस्था मजबूत असेल तरच पायाभूत सुविधा विकास आणि विशेषत्वाने गरीब कल्याणाचा अजेंडा प्रभावीपणे राबवता येतो. काँग्रेसच्या काळात पायाभूत सुविधांसाठी केवळ एक लाख कोटी खर्च व्हायचा. मात्र मोदी सरकारच्या काळात 13 लाख कोटी खर्च करून सर्वांगीण विकास साधला जात असल्याचेही फडणवीस यांनी नमूद केले.

Continue reading

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...

रविवारी आनंद घ्या रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, १२ जुलैला सायंकाळी पाच वाजता पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना इशान घोष...
Skip to content