Homeकल्चर +महिला दिनानिमित्त उद्या...

महिला दिनानिमित्त उद्या ‘लोकशाही’चा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर!

नुकत्याच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘लोकशाही’ चित्रपटाने चित्रपटगृहांमध्ये जोरदार धुमाकूळ घातला. उद्या, ८ मार्चला अल्ट्रा झकास, या मराठी ओटीटीवर या चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार असून रसिकांना पुन्हा हा अभूतपूर्व अनुभव घेता येणार आहे.

समाजकारणात रस असलेल्या राजकारणी घराण्यात वाढलेल्या मुलीच्या आयुष्यात अनपेक्षित घटनांची साखळी घडत जाते. हीच साखळी तिच्या वडिलांच्या हत्त्येचं कारण बनते. सत्तेच्या हव्यासापोटी रक्ताच्याच नात्यांनी तिच्या वडिलांचा जीव घेतला आहे. मात्र हत्त्या आणि त्यामागचा कट कोणाचा आहे हे चित्रपटात कळणार आहे.

ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे आणि महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री तेजश्री प्रधान यांच्या भूमिका प्रेक्षकांना खिळवून ठेवणार असून अंकित मोहन, डॉ. गिरीश ओक, समीर धर्माधिकारी, भार्गवी चिरमुले, अमित रियान, शंतनु मोगे, प्रसन्न केतकर, सुश्रुत मंकणी, अजिता कुलकर्णी, सोनल वाघमारे हे प्रसिद्ध कलाकार राजकारणाच्या भयाण खेळात धुरळा उडवण्यासाठी उतरले आहेत.

लोकशाही चित्रपट सुशीलकुमार अग्रवाल यांनी निर्मित केला असून संजय अमर यांनी कथा, पटकथा आणि दिग्दर्शित केला आहे. चित्रपटाला संगीत दिग्दर्शन संजय-राजी या जोडीने दिले असून चित्रपटातील गाणी जयदीप बागवडकर आणि राजलक्ष्मी संजय यांनी गायली आहेत. संजय अमर आणि शाम मळेकर यांनी गीत शब्दबद्ध केले आहेत.

राजकारणातील महिलांचं अस्तित्त्व, घराणेशाही, आणि सत्तासंघर्ष ‘लोकशाही’ चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या पद्धतीचे अनेक दर्जेदार चित्रपट आम्ही अल्ट्रा झकासच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी उपलब्ध करत राहणार आहोत, असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे सी.ई.ओ. सुशीकुमार अग्रवाल म्हणाले.

नवनवीन चित्रपट पाहण्यासाठी:- https://www.ultrajhakaas.com/marathi-movies

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content