Homeबॅक पेजआता संध्याकाळी 6...

आता संध्याकाळी 6 वाजेपर्यंत भेट देऊ शकता अमृत उद्यानाला!

उद्यान उत्सव-1, 2024 अंतर्गत राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान 31 मार्च 2024पर्यंत जनतेसाठी खुले असणार आहे. आता पर्यटक सोमवार वगळता आठवड्यातून सहाही दिवस सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 या कालावधीत उद्यानाला भेट देऊ शकतात (अंतिम प्रवेश– सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत). यापूर्वी हे उद्यान जनतेसाठी सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत खुले असायचे (अंतिम प्रवेश– सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत).

अभ्यागतांना या उद्यानाला भेट देण्यासाठी खालील लिंकवर नोंदणी करावी लागेल.

https://visit.rashtrapatibhavan.gov.in/visit/amritudyan/rE

 नोंदणी न करता प्रत्यक्ष भेट देणाऱ्या (वॉक-इन) अभ्यागतांना राष्ट्रपती भवनाच्या गेट क्रमांक 12जवळील सुविधा केंद्रावर किंवा सेल्फ सर्व्हिस कियॉस्कवर (स्वयंसेवा केंद्रावर) स्वतःची नोंदणी करावी लागेल.

Continue reading

डोनाल्ड ट्रम्पच्या मनमानीला लागणार लगाम?

मनात आले, व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींना उचलून आणलं, इराणवर हल्ला केला, भारताच्या रशियाकडून होणाऱ्या तेलखरेदीवर निर्बंध लादले, आयातकर (टॅरिफ) दुप्पट-तिप्पट केला, अमेरिकेतल्या भारतीयांच्या व्हिसावर निर्बंध लादले, अशी मनमानी करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अधिकारांना लगाम लागणार की, हे अधिकार अधिक...

पंतप्रधान मोदी करणार आज पुण्याच्या ‘पिंक लाईन’ मेट्रोचे उद्घाटन!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमाराला, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे, सुमारे 21,800 रुपयांच्या पुणे मेट्रो प्रकल्पाची पायाभरणी तसेच ‘पिंक लाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे मेट्रो मार्गिका 3चे उद्घाटन करणार आहेत. 8,300 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून हा प्रकल्प उभारण्यात...

बेस्ट कर्मचाऱ्यांनाही ३३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान

मुंबई महापालिकेपाठोपाठ मुंबईकराच्या दैनंदिन जीवनातल्या लाईफलाईनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनाही यंदा ३३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. येत्या मंगळवारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांची संघटना श्रमिक उत्कर्ष सभेचे नेते आमदार प्रसाद लाड यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री...
Skip to content