Homeकल्चर +अँम्ब्रोशिया गार्डनमधल्या संगीत...

अँम्ब्रोशिया गार्डनमधल्या संगीत महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एस विभागातर्फे पवई येथील पंडित दिन दयाल उपाध्याय उद्यान तथा अँम्ब्रोशिया गार्डन येथे दिनांक 24 व 25 फेब्रुवारी 2024 रोजी ‘नॅशनल सेंटर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स’ यांच्यामार्फत ‘एनसीपीए ॲट द पार्क’  हा संगीत महोत्सव आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास मोठा प्रतिसाद मिळाला.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागामार्फत त्यांच्या अखत्यारित असलेल्या भूखंडांमध्ये नेहमीच वेगवेगळे स्तुत्य उपक्रम राबविण्यात येतात. याचाच एक भाग म्हणून व नागरिकांचा उद्यानातील वावर वाढवा व नवोदित कलाकारांना एक हक्काचा मंच मिळावा यासाठी निसर्गाच्या सानिध्यात वीकेंडला  सायंकाळी संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला. अनेक कलाकारांनी या कार्यक्रमात सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. हा कार्यक्रम सर्वांनाच निःशुल्क उपलब्ध होता, अशी माहिती उद्यान विभागाचे प्रमुख उद्यान अधीक्षक जितेन्द्र परदेशी यांनी दिली.

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content