Homeचिट चॅटपू. वैद्य विनय...

पू. वैद्य विनय भावे यांचा देहत्याग!

मूळचे रायगड येथील प्रख्यात वैद्य तथा सनातनचे ३५वे संत आयुर्वेद प्रवीण पू. वैद्य विनय नीळकंठ भावे (वय ६९ वर्षे) यांनी काल, २५ जून २०२१ रोजी रात्री १० वाजता मोर्डे (जिल्हा रत्नागिरी) येथे देहत्याग केला.

गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्या पार्थिवावर २६ जूनला सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. पू. वैद्य भावे काका सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्‍वर तालुक्यातील मोर्डे येथे राहत होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, सून आणि नात असा परिवार आहे. पू. भावे यांचा संपूर्ण परिवार सनातनच्या मार्गदर्शनाखाली साधनारत आहे.

पू. वैद्य विनय भावे यांचा परिचय

पू. वैद्य विनय नीळकंठ भावे हे मूळचे रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वरसई या गावचे आहेत. वैद्य परंपरेची त्यांच्या घराण्यातील त्यांची पाचवी पिढी आहे. त्यांनी स्वतःच्या मालकीचा ‘श्री अनंतानंद औषधालय’ या नावाचा आयुर्वेदीय औषधे बनवण्याचा कारखाना स्थापून शास्त्रोक्त आणि प्रभावी औषधांची निर्मिती करत अनेक वर्षे आयुर्वेदाची सेवा केली. अवघ्या महाराष्ट्रातील वैद्यांमध्ये ते ‘वरसईकर वैद्य भावे’ म्हणून प्रसिद्ध होते.

रुग्णांवर उपचार करणे तसेच औषधनिर्मिती या दोन्ही क्षेत्रांतील त्यांचा अनुभव दांडगा होता. अभ्यासू वृत्ती, इतरांना सर्वतोपरी साहाय्य करणे, मनमिळाऊ स्वभाव आणि त्यागी वृत्ती ही त्यांची स्वभाववैशिष्ट्ये होती. पू. भावे यांना रायगड जिल्हा परिषदेने २०१३ या वर्षी ‘रायगड भूषण’ पुरस्काराने सन्मानित केले होते. गेल्या काही वर्षांपासून ते महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा येथे आयुर्वेदशास्त्रातील संशोधक म्हणून सेवारत होते. त्यांच्या देहत्यागामुळे आयुर्वेद क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दांत सनातन संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content