Homeकल्चर +एकटेपणावरची मात्रा.. ‘लॉस्ट...

एकटेपणावरची मात्रा.. ‘लॉस्ट अँड फाऊंड’!

आजच्या धकाधकीच्या जीवनात लोकांना एकमेकांशी बोलायला वेळ मिळत नाही. ऋतुराज धलगाडे दिग्दर्शित ‘लॉस्ट अँड फाऊंड’ चित्रपटाने आयुष्यात एकटेपणा जाणवणाऱ्या लोकांना त्यांच्या जीवनातील आनंदाचे क्षण शोधण्यासाठी प्रेरित करण्याचा सुंदर संदेश दिला आहे. ‘लॉस्ट अँड फाऊंड’, हा चित्रपट उद्या, १ फेब्रुवारी २०२४ रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावण्याचे दु:ख लोक उराशी बाळगून असतात. कुटुंबापासून दूर राहणाऱ्या लोकांना एकटेपणा जाणवतो. अशा लोकांच्या आयुष्यातील संवादाचा दुरावा भरून काढण्यासाठी मानस, नैना, मारुती आणि श्रीरंग काका हे चार लोक ‘ॲंटी लोनलीनेस प्रोग्राम’ सुरू करतात. लोकांच्या जीवनातील एकटेपणाची पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न करतात. पण प्रोग्राम यशस्वी ठरेल की नाही हे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

एकटेपणा हा केवळ शब्द नसून ती एक भावना आहे, जी ठराविक काळाने कोणालाही जाणवू शकते. परंतु त्याचा परिणाम न होता आनंदी राहण्याचा प्रयत्न करणे ही गरज आहे. हा विलक्षण संदेश देणारा चित्रपट तुम्हाला नक्कीच आवडेल अशी आशा आहे, असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लि.चे सी.ई.ओ. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content