Homeएनसर्कल१३ वर्षीय पलाश...

१३ वर्षीय पलाश वाघने तयार केले हवामान ॲप! 

राज्यात सतत बदलत असलेल्या हवामानामुळे तसेच, वाढत्या प्रदूषणामुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सरकारकडून यावर अनेक उपाययोजना केल्या जात असल्या तरी परिस्थिती ‘जैसे-थे’च आहे. याला अपवाद ठरला आहे पुण्यातील द अकॅडमी स्कूल (TAS)चा १३ वर्षीय विद्यार्थी पलाश वाघ. हा विद्यार्थी इयत्ता आठवीमध्ये शिकत आहे. पलाश याने हवामानाचा अंदाज घेणारे ॲप तयार केले आहे. या ॲपद्वारे वापरकर्त्यांना कोणत्याही गाव, शहर किंवा देशाच्या हवामानाचा अंदाज घेण्यास मदत होईल.

पलाश वाघ म्हणाला की, “इतरांपेक्षा मला काहीतरी वेगळं करायचं आहे. माझे आवडते विषय भूगोल आणि संगणक आहे. या दोन विषयांचा आधार घेऊन मी कोडिंग करण्याचा प्रयत्न केला. हे ॲप जावा स्क्रिप्ट आणि एचटीएमएल वापरून तयार केले आहे. वापरकर्ता इंटरफेस सीएसएसने केला आहे. हे ॲप  ॲपप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (API) नावाच्या सॉफ्टवेअरशी जोडले गेले आहे, जे उपकरणाच्या स्थानानुसार रिअल-टाइम हवामान दर्शवण्यास मदत करते. हे ॲप परिसरातील वाऱ्याचा वेग आणि आर्द्रता देखील दर्शवते.”

“विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष अनुभवातून त्यांना प्रगल्भ करण्याचा प्रयत्न द अकॅडमी स्कूल (TAS) नेहमीच करत असते. शाळेतील अशा वातावरणामुळे पलाश वाघ, या विद्यार्थ्याला हे यश मिळवणं अधिक सोप झालं. प्रात्यक्षिकरित्या विद्यार्थी शिकताना त्यांच्यातील सर्वोत्कृष्ट गोष्टी समोर येतात आणि विद्यार्थ्यांना शिकण्यातदेखील आनंद मिळतो. शिवाय, शिकत असताना त्यांना प्रोत्साहन देणे,  त्यांच्या कलागुणांना वाव देणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो. ‘विद्यार्थ्याद्वारे आणि विद्यार्थ्यांसाठी’ या शाळेच्या ब्रीदवाक्याचा खरा अर्थ पलाश वाघ या विद्यार्थ्याच्या कामगिरीतून स्पष्ट होतो.’, असे टीएएसच्या सीईओ डॉ. मैथिली तांबे म्हणाल्या.

पलाश वाघ या विद्यार्थ्याने तयार केलेल्या या ॲपला टास व्यावसायिकरित्या समर्थन देण्यासाठी आणि ते अँड्रॉइड तसेच आयओएस सॉफ्टवेअरवर ॲप स्टोअरवर लॉन्च करण्याची योजना आखत आहे. शाळेमध्ये पलाशला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून कौतुकाची थाप मिळत आहे.

Continue reading

मुंबई-नवी मुंबईतली अनेक प्राप्तीकर कार्यालये भाड्याच्या जागेत!

'आयकर सिंधु'च्या उभारणीपूर्वी विविध परवानग्या मिळवण्यात आणि अतिक्रमणे हटवण्यात आलेल्या अडचणी लक्षात घेता सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या दैनंदिन समस्या सोडवताना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते, याचा आयकर अधिकाऱ्यांनी गांभीर्याने विचार करावा आणि प्रशासन सदैव नागरिककेंद्री राहील याची खात्री करत आपले...

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...
Skip to content