Homeबॅक पेज'वीर बाल दिना'निमित्तच्या...

‘वीर बाल दिना’निमित्तच्या कार्यक्रमात आज पंतप्रधान मोदी होणार सहभागी!

नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं आज, 26 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता ‘वीर बाल दिना’निमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात ते दिल्लीतल्या तरुणांच्या संचलनाला हिरवा झेंडा दाखवतील.

या दिनाचे औचित्य साधून नागरिकांना विशेषत: लहान मुलांना, साहिबजादा यांच्या अतुलनीय शौर्य गाथांची माहिती करून देणे आणि त्यांच्यात जागृती निर्माण करण्याच्या उद्देशानं सरकारच्या वतीनं देशभरात नागरिकांचा सहभाग असलेल्या विविध कार्यक्रमांचे आयोजन केलं जाणार आहे. देशभरातल्या शाळा आणि बालसंगोपन संस्थांमध्ये डिजीटल स्क्रीनच्या माध्यमातून साहिबजाद्यांच्या जीवनगाथा आणि बलिदानाची माहिती देणारं प्रदर्शनही आयोजित केलं जाणार आहे. यानिमित्तानं देशभरात ‘वीर बाल दिना’ विषयी एक चित्रपटही दाखवला जाणार आहे. यासोबतच MYBharat आणि MyGov पोर्टलच्या माध्यमातून संवादात्मक स्वरुपातल्या ऑनलाईन प्रश्नमंजुषांसारख्या स्पर्धांचंही आयोजन केलं जाणार आहे.

श्री गुरु गोविंद सिंग यांचे पुत्र साहिबजादा बाबा जोरावर सिंग जी आणि बाबा फतेह सिंग जी यांच्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी 26 डिसेंबर हा दिवस ‘वीर बाल दिन’ म्हणून साजरा केला जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, गेल्या वर्षी 9 जानेवारीला श्री गुरु गोविंद सिंह जी यांच्या प्रकाशपर्वाच्या दिनी केली होती.

Continue reading

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...
Skip to content