Homeमुंबई स्पेशलपार्ले महोत्सवाचे मुंबईत...

पार्ले महोत्सवाचे मुंबईत शानदार उद्घाटन!

पार्ले महोत्सवाने अनेकांना व्यासपीठ दिले. त्यातून उत्तम संघटक आणि नेतृत्त्व करणाऱ्यांबरोबर आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू आणि कलाकार निर्माण केले. त्यांनी राज्याचे आणि देशाचे नाव मोठे केले. त्यामुळेच या महोत्सवात प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे विचार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पार्ले महोत्सव २०२३च्या उद्घाटनप्रसंगी केले.

पार्ले

पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी ओळखली जाते तसेच पार्ले ही मुंबईची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जात आहे. मुंबईतील मोठा महोत्सव अशी पार्ले महोत्सवाने ओळख निर्माण केली आहे. संस्कृती (Culture), खाद्यसंस्कृती (Cuisine) आणि कलाकार (Celebrity) यामुळे पार्लेची विशेष ओळख असून या महोत्सवात सहभागी झाल्याचा आनंद झाला. पार्ले महोत्सवाचे दरवर्षी उत्कृष्ट आयोजन करण्यात येत असल्याने या महोत्सवाला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देतात आणि हा महोत्सव त्यांना आपला वाटतो. येणाऱ्या काळात येथील फॅनेल झोन आणि विमानतळाजवळील झोपडपट्टी पुनवर्सन विषय मार्गी लावण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यंदा पार्ले महोत्सवाचे २३वे वर्ष असून विविध ३२ स्पर्धांमधून सुमारे ३० हजार स्पर्धक सहभागी होत आहेत. या महोत्सवाचे वामन मंगेश दुभाषी मैदानावरील शानदार सोहळ्यात मशाल प्रज्वलित करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार पूनम महाजन, महोत्सवाचे मुख्य आयोजक आणि आमदार पराग अळवणी, सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, माजी मंत्री डॉ. दीपक सावंत, अभिनेते शैलेंद्र दातार, अभिनेत्री सुधा चंद्रन, नगरसेविका ज्योती अळवणी, अनिल गानू, माधव राजवाडे, डॉ. अलका मांडके आणि अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.

पार्ले महोत्सवाचे आयोजक पराग अळवणी यांनी या महोत्सवातून नेतृत्त्व करणारी मंडळी घडवली. त्यामुळेच त्यांना सुपर लीडर म्हणता येईल, तसेच पार्लेकर हा महोत्सव घरचे कार्य समजून येतात, हे विशेष. यातूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपेक्षित असलेली खेलो इंडियाची चळवळ पुढे जात असल्याचे खासदार पूनम महाजन यांनी सांगितले.

या महोत्सवाच्या शानदार गीताचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मयूरेश माडगांवकर आणि कलाकारांनी त्याची निर्मिती केली आहे. यावेळी जान्हवी जाधव, अक्षय तरळ या महोत्सवातून पुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी केलेल्या खेळाडूंचा तसेच प्रशिक्षक गणेश देवरूखकर यांचा आणि सारेगम स्पर्धेची उपविजेती पार्लेकर श्रावणी वागळे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. प्रारंभी श्रावणी वागळे हिच्या गाण्याने तसेच हास्यकलाकार समीर चौगुले आणि चेतना भट यांच्या प्रहसनाने कार्यक्रमात रंगत आणली.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content