Homeपब्लिक फिगरमागचे सरकारच मराठा...

मागचे सरकारच मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी! 

मराठा आरक्षणाचे खरे मारकरी कोण आहेत, यावर चर्चा व्हायला हवी ही, अशी अपेक्षा व्यक्त करून आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे सरकारवर मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकवण्यात अपयश आल्याचा आरोप केला. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याला आमचा विरोध आहे, हे स्पष्ट करून मराठा हा शब्द मिटवून टाकायचा हा प्रयत्न आहे का, असा सवालही त्यांनी केला.   

मुखपत्रातून मराठा मोर्चांचा उल्लेख मुका मोर्चा असा करणाऱ्या लोकांचे सरकार मराठा आरक्षण देतील का, असा सवालही राणे यांनी केला. माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना व्हिलन करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे सांगून राणे म्हणाले की, मनोज जरांगे यांचा आज उदोउदो करणारे जरांगे अडचणीत होते, तेव्हा कुठे होते. त्यांना वकील आम्ही दिला होता, हे सांगून राणे म्हणाले की, देवेन्द्रजींनी आरक्षण टिकून दाखवले. त्याप्रकारे प्रामाणिक प्रयत्न या लोकांनी केले असते तर हिंसक प्रकारही झाले नसते आणि मराठा युवकांना जीवही गमवावे लागले नसते.

मराठा

एक व्यक्ती आरक्षणासाठी उपोषणाला बसतो, तो स्वतः बोलतोय की त्याच्या हातात कोणी स्क्रीप्ट दिलीय, हा प्रश्न उपस्थित करून राणे म्हणाले की, एकाच व्यक्तीवर टीका केली जातेय. एका बाजूला नेत्यांना गावबंदी आणि दुसरीकडे संघर्षयात्रा, हे कसे होते, हा सवाल करून राणे म्हणाले की, ही मँचफिक्सिंग आहे का… याचे उत्तर मिळाले पाहिजे.

भुजबळसाहेब, एक व्यक्ती म्हणजे मराठा समाज नाही. बहुजन समाज म्हणून सर्व जातींचे लोक सलोख्याने राहतो. त्यामुळे उगाच वातावरण बिघडता कामा नये आणि आपण एकत्र व्यासपीठ तयार करू. इतर कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण हवे, हे सांगू. ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिले जावे, हेच आमचे मत आहे, असेही ते म्हणाले.  

पडघा गावात गावाचे नाव अल शान केले आणि इस्लामीकरण सुरू झाले, असे सांगून राणे म्हणाले की, आपण जातीजातींमध्ये भांडतोय आणि तिकडे अतिरेकी दहशतवादी कारवाया करताहेत, याकडे लक्ष द्यायला हवे, अशी मागणीही राणे यांनी केली.

Continue reading

काँग्रेसची मंत्रालयासमोरची जागा परस्पर आरबीआयच्या घशात!

काँग्रेससह विविध राजकीय पक्षांची नरीमन पाईंट भागातील कार्यालयांचे मेट्रोच्या कामासाठी सरकारच्या विनंतीवरून तात्पुरते स्थलांतर करण्यात आले होते. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचजागी काँग्रेससह सर्व कार्यालये नव्याने बांधून देण्याचे आश्वासन मेट्रो कार्पोरेशनने दिले होते. पण आता मात्र काँग्रेस पक्षाला अंधारात...

लाभ घ्या आयुष्मान भारत आणि म. फुले जनआरोग्य योजनेचा

महाराष्ट्रात ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना’ आणि ‘महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना’ एकत्रित राबविण्यात येत असून राज्यातल्या सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. सर्व लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड राज्यातल्या आशा कर्मचारी, आपले सरकार सेवा केंद्रातील कर्मचारी तसेच स्वस्त धान्य दुकानचालक यांच्यामार्फत तयार केले...

एमआयजी क्रिकेट क्लबची राज्य मानांकन कॅरम स्पर्धा

मुंबईतल्या एमआयजी क्रिकेट क्लबच्या वतीने तिसरी महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धा येत्या 27 ते 29 सप्टेंबर 2025दरम्यान एमआयजी क्रिकेट क्लब, कलानगर वांद्रे (पाश्चिम), मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन विभागात खेळविण्यात येणाऱ्या या...
Skip to content