Homeन्यूज अँड व्ह्यूज१० वर्षांत परदेशांतून...

१० वर्षांत परदेशांतून आणलेल्या ३१ कलाकृती तामिळनाडूतील!

जेव्हा जेव्हा परदेशात मूळ भारतीय अशी कोणतीही पुरातन कलाकृती आढळते, तेव्हा एएसआय ती कलाकृती परत आणण्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयामार्फत परदेशातील भारतीय दूतावास/राजदूत यांच्याकडे प्रकरण सोपवते. आणि त्या कलाकृती परत आणण्याकरीता प्रयत्न केले जातात. गेल्या दहा वर्षांत परदेशातून जप्त करण्यात आलेल्या पुरातन कलाकृतींपैकी ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, ब्रिटन आणि अमेरिकेतून जप्त करण्यात आलेल्या 31 पुरातन कलाकृती तामिळनाडूतील आहेत. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांनी लोकसभेत ही माहिती दिली.

राज्याच्या परवानगीशिवाय बेकायदेशीरपणे निर्यात केलेल्या भारतीय पुरातन कलाकृती पुन्हा देशात आणल्या जात आहेत. जेव्हा एखाद्या पुरातन कलाकृतींच्या चोरीची तक्रार केली जाते, तेव्हा संबंधित पोलीसठाण्यात एफआयआर दाखल केला जातो आणि चोरी झालेल्या पुरातन कलाकृतींचा शोध घेण्यासाठी आणि त्यांची बेकायदेशीर निर्यात रोखण्याच्या दृष्टीने दक्ष राहण्यासाठी सीमा निर्गमन मार्गासह कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या संस्थांना ‘लूक आउट नोटीस’ जारी केली जाते. पुरातन कलाकृती सापडल्यास, त्या परत आणण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या (एएसआय) समन्वयाने संबंधित कायदा अंमलबजावणी आंस्थेद्वारे प्रकरणाचा पाठपुरावा केला जातो.

भारतातून घेऊन गेलेल्या मूळ भारतीय पुरातन कलाकृती परत आणण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. एएसआय ने 1976 ते 2023 या कालावधीत परदेशातील 357 पुरातन कलाकृती परत आणल्या आहेत, त्यापैकी 2014 पासून 344 पुरातन कलाकृती परत मिळवल्या आहेत.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content