Homeकल्चर +हॉलीवूडचा सुपरहिट चित्रपट‘मनी...

हॉलीवूडचा सुपरहिट चित्रपट‘मनी प्लेन’ आता मराठी ओटीटीवर!

आजवरची सर्वात मोठी चोरी करणारा नायक ज्या चित्रपटात खळबळ उडवून टाकतो, तो हॉलीवूडचा सुपरहिट चित्रपट ‘मनी प्लेन’ आता रसिक प्रेक्षकांना मराठीत पहायला मिळणार आहे. हा चित्रपट १५ डिसेंबरला ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांना मनोरंजनात गुंतवून ठेवणार आहे.

चित्रपटाची कथा ‘मनी प्लेन’ या नावाने ओळखली जाणारी एअरबोर्न कॅसिनोवरील मोठ्या चोरीभोवती फिरते. जिथे जगातील सर्वात मोठमोठे गुन्हेगार उपस्थित आहेत. हे मोठमोठे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे गुन्हेगार जुगार खेळण्यासाठी एकत्र येतात, तेव्हा चित्रपटाच्या नायकाला स्वतःवरचे कर्ज मिटवून कुटुंबाला वाचवण्याची संधी मिळते.आयुष्यातील सर्वात मोठी चोरी करण्याचे धाडस नायक करणार की कुटुंबाला कर्जात बुडवणार हे चित्रपटात कळणार आहे.

चित्रपटाच्या दिग्दर्शकाने पूर्ण अॅक्शन आणि सस्पेन्स भरलेला चित्रपट देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला असेच अॅक्शन आणि रोमांचक चित्रपट पाहायला आवडत असतील तर मनी प्लेनचित्रपट तुमच्यासाठी अगदी योग्य चित्रपट ठरणार आहे असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेडचे सी.ई.ओ. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content