Homeन्यूज अँड व्ह्यूजअणुउर्जा हा सर्वात...

अणुउर्जा हा सर्वात उर्जानिर्मितीसाठी स्वच्छ पर्याय!

स्वच्छ उर्जा स्थित्यंतरासाठी सरकार लहान अणुभट्टीसारख्या नव्या तंत्रज्ञानांवर काम करत आहे अशी माहिती केंद्रीय अणुउर्जा आणि अवकाश या विभागांचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी नुकतीच लोकसभेत दिलेल्या लिखित उत्तरात दिली. अणुउर्जा हा उर्जानिर्मितीसाठी सर्वात आश्वासक स्वच्छ उर्जापर्याय आहे, असे ते म्हणाले.

येत्या काही वर्षात जीवाश्म इंधनावरीर अवलंबीत्व कमी करू शकणाऱ्या अणुऊर्जेचा वापर करण्याच्या धोरणावर जगभरात भर दिला जात आहे.

कमी क्षमतेचे अणुउर्जा प्रकल्प ज्यांना सार्वत्रिकपणे लहान मॉड्युलर अणुभट्ट्या (एसएमआर्स) म्हणतात. त्यांच्या लघु आकार आणि मोठ्या प्रमाणातील कार्यक्षमता तसेच कमी कार्बन पदचिन्हे तसेच सुधारित सुरक्षितता या वैशिष्ट्यपूर्ण घटकांमुळे या अणुभट्ट्या कार्यनिवृत्त होत असलेल्या कोळशावर आधारित औष्णिक उर्जा उत्पादन केंद्राच्या जागांचा पुनरुपयोग करण्यासाठीचा आकर्षक पर्याय ठरतात. देशभरात सर्वत्र, विशेषतः मोठ्या अणुभट्ट्या उभारण्यासाठी सोयीस्कर नसलेल्या ठिकाणी लहान मॉड्युलर अणुभट्ट्या (एसएमआर्स) उभारल्यास, त्यांतून कमी कार्बन उत्सर्जनासह मोठ्या प्रमाणात विद्युतनिर्मिती करता येऊ शकेल. जीवाश्म इंधन वापर टाळण्याच्या दृष्टीने, जुन्या झालेल्या जीवाश्मइंधन आधारित विद्युतनिर्मिती प्रकल्पांचा पुनरुपयोग करण्यासाठी देखील एसएमआर्सची उभारणी तसेच कार्यान्वयन करता येऊ शकेल.

अर्थात, एसएमआर्स हे मोठ्या आकाराच्या अणुउर्जा आधारित पारंपरिक विद्युतनिर्मिती प्रकल्पांना पर्याय ठरू शकत नाहीत कारण हे मोठे प्रकल्प पायाभूत पातळीवर मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती करतात.

प्रत्येक परिस्थितीत किरणोसर्ग नियंत्रित करण्यासाठी आणि जनतेला त्या किरणांचा संपर्क होणे टाळण्यासाठी घालून दिलेल्या कठोर नियामकीय अटींनुसारच अणुउर्जा प्रकल्प उभारले आणि परिचालित केले जातात. एसएमआर्सचा तांत्रिक-व्यावसायिक दृष्टीकोन जगातील पातळीवर देखील अजून प्राथमिक अवस्थेत आहे आणि त्यांची मोठ्या प्रमाणातील अंमलबजावणी, आंतरराष्ट्रीय अणुउर्जा संस्थेतर्फे (आयएईए) जागतिक पातळीवरील नियामकीय सुसंवादीकरणासह, विशेषतः आपत्कालीन नियोजन विभाग आणि सार्वजनिक स्वीकृतीसह  विविध घटकांवर अवलंबून आहे.

Continue reading

सरकारने शेतकऱ्यांची थट्टा थांबवावी!

ऐन दिवाळीच्या तोंडावर दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या हातात भरीव मदत देण्याऐवजी अवघ्या पाच हजार रुपयांची घोषणा करून राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, डोळ्यांसमोर उद्ध्वस्त झालेली पिके, कर्जाचा डोंगर आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न या पाच हजार...

रजेवर भिमनवार; एमपीएससीच्या हंगामी अध्यक्षपदी वाघोले स्वार!

राज्याच्या विधि न्याय विभाग आणि संसदीय कार्य विभागाचे निवृत्त सचिव सतीश वाघोले यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) हंगामी (प्रभारी) अध्यक्षपदी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी नियुक्ती केली आहे. एम.पी.एस.सी.च्या प्रश्नपत्रिका फुटत असल्याच्या प्रकरणावरून एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्यासाठी...

राष्ट्रीय स्लिंगशॉट स्पर्धेत गौरव मोकाशींना सुवर्णपदक

१४वी राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिप-२०२६ स्पर्धा छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ४० ते ४५ वर्षे वयाच्या गटात दहिसर, मुंबईचे गौरव मोकाशी यांनी सुवर्णपदक पटकावले. या आधीच्या राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिपमध्ये त्यांना रौप्यपदक मिळाले होते....
Skip to content