Homeचिट चॅटबीएनपी पारिबसच्या कर्मचाऱ्यांनी...

बीएनपी पारिबसच्या कर्मचाऱ्यांनी केले ३२ हजार किलो धान्याचे वाटप

बीएनपी पारिबस कंपनीने ‘दान २०२३’ हा त्यांचा वार्षिक कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी उपक्रम (सीएसआर) यशस्वीपणे पार पाडला आहे. यावर्षी बीएनपी पारिबसच्या कर्मचाऱ्यांनी डाळ, तांदूळ आणि पीठ मिळून एकत्रितपणे ३२ हजार किलो धान्याचे समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटाला दान करत त्यांच्या घरात सणांचा आनंद फुलवला. हा उपक्रम देशाच्या तीन भागात मुंबई, चेन्नई आणि बेंगळुरू येथे आयोजित करण्यात आला होता.

भारतात कायमच भुकेची समस्या चिंताजनक बाब राहिली आहे. ग्लोबल हंगर इंडेक्स २०२३नुसार भारत अशा १२५ देशांमध्ये १११व्या स्थानावर असून गेल्या काही काळात त्यात किंचित सुधारणा झाली आहे. या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन उपाययोजना करणे आवश्यक असून दान उत्सवसारखे उपक्रम भुकेविरोधातील भारताच्या लढाईत सकारात्मक योगदान देतील.

या उपक्रमाचा एक भाग म्हणून बीएनपी पारिबसने वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांशी (एनजीओ) करार केला असून त्यात असीमा (महाराष्ट्र), आधार (महाराष्ट्र) बीजे होम्स (महाराष्ट्र) प्रेमा वासम (चेन्नई) रॉबिनहूड आर्मी, समर्थानम (कर्नाटक) आणि अध्वम उल्लंगल (तमिळनाडू) यांचा समावेश आहे. या संस्थांच्या मदतीने दान करण्यात आलेल्या अन्नाचे प्रभावी वितरण आणि वापर होईल याची काळजी घेण्यात आली. या संस्था तळागाळातील समाजापर्यंत पोहोचण्याच्या आपल्या कौशल्याच्या मदतीने वंचित घरांतील मुले व प्रौढांच्या पोषणविषयक गरजा पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका निभावत आहेत. १२९०० किलो तांदूळ, १३६०० किलो पीठ आणि ५३०० किलोपेक्षा जास्त डाळीचे या उपक्रमाअंतर्गत वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे, बीएनपी पारिबसच्या कर्मचाऱ्यांनी धान्याचे प्रभावी वाटप करण्यात प्रत्यक्षातही सक्रिय मदत केली.

कर्मचाऱ्यांचा सहभाग आणि एनजीओ भागिदारांप्रती कृतज्ञता व्यक्त करत बीएनपी पारिबसच्या सीएसआर, ब्रँड आणि कम्युनिकेशन विभागाच्या प्रमुख मनिषा खोसला म्हणाल्या की, ‘दान उत्सव’च्या आणखी एका आवृत्तीची यशस्वी सांगता करताना कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सक्रिय योगदानाबद्दल मी त्यांचे आभार मानते. त्यांच्या सहभागाशिवाय हा उपक्रम अपूर्ण आहे. त्यांच्या दातृत्वामुळे सणांचा हा काळ आणखी प्रकाशमान झाला, शिवाय समाजाच्या कल्याणाची सर्वांवर असलेली एकत्रित जबाबदारी यानिमित्ताने अधोरेखित झाली.

त्याशिवाय गोळा करण्यात आलेल्या धान्याचे प्रभावी वाटप करणाऱ्या आमच्या प्रतिष्ठित एनजीओचेही मी आभार मानते. एकत्रितपणे आम्ही सकारात्मक आणि दीर्घकाळ टिकणारा बदल घडवून आणू आणि कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी खऱ्या अर्थाने पार पाडू अशी मला खात्री वाटते. बीएनपी पारिबस विविध स्त्रोतांचा वापर करत गरजूंच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम घडवून आणण्यासाठी बांधील आहे. अशा प्रकारच्या उपक्रमांतून कंपनीने समाजात भरीव बदल घडवून आणण्याप्रती आपला निश्चय दाखवून दिला आहे, असेही त्यांनी सांगितले.

Continue reading

डोनाल्ड ट्रम्पच्या मनमानीला लागणार लगाम?

मनात आले, व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींना उचलून आणलं, इराणवर हल्ला केला, भारताच्या रशियाकडून होणाऱ्या तेलखरेदीवर निर्बंध लादले, आयातकर (टॅरिफ) दुप्पट-तिप्पट केला, अमेरिकेतल्या भारतीयांच्या व्हिसावर निर्बंध लादले, अशी मनमानी करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अधिकारांना लगाम लागणार की, हे अधिकार अधिक...

पंतप्रधान मोदी करणार आज पुण्याच्या ‘पिंक लाईन’ मेट्रोचे उद्घाटन!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमाराला, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे, सुमारे 21,800 रुपयांच्या पुणे मेट्रो प्रकल्पाची पायाभरणी तसेच ‘पिंक लाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे मेट्रो मार्गिका 3चे उद्घाटन करणार आहेत. 8,300 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून हा प्रकल्प उभारण्यात...

बेस्ट कर्मचाऱ्यांनाही ३३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान

मुंबई महापालिकेपाठोपाठ मुंबईकराच्या दैनंदिन जीवनातल्या लाईफलाईनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनाही यंदा ३३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. येत्या मंगळवारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांची संघटना श्रमिक उत्कर्ष सभेचे नेते आमदार प्रसाद लाड यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री...
Skip to content