Homeमुंबई स्पेशलउद्या दक्षिण मुंबईत...

उद्या दक्षिण मुंबईत अनेक ठिकाणी पाणीकपात!

मुंबईतल्या मलबार हिल जलाशय पुनर्बांधणी संदर्भात तज्ज्ञ समिती उद्या गुरुवार ७ डिसेंबरला अंतर्गत पाहणी करणार असल्याने मुंबईतल्या ए, सी, डी, जी उत्तर, जी दक्षिण विभागातील पाणीपुरवठ्यात कपात करण्यात येणार असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेने जाहीर केले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याअनुषंगाने आय.आय.टी. पवईचे प्राध्यापक, स्थानिक तज्ज्ञ नागरिक, महापालिका अधिकारी यांचा समावेश असलेली तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आली आहे. सध्याच्या प्रस्तावाचे पुनरावलोकन करुन या समितीने योग्य कार्यपद्धती सुचविणे अपेक्षित आहे. त्यामुळे तज्ज्ञ समितीमार्फत उद्या गुरूवार, दिनांक ७ डिसेंबर २०२३ रोजी मलबार हिल जलाशयामधील कप्पा क्रमांक २ची अंतर्गत पाहणी करण्यात येणार आहे. या कारणाने जलाशयाचा कप्पा क्रमांक २ रिक्त करणे आवश्यक आहे. त्यामुळे ए, सी, डी, जी उत्तर, जी दक्षिण विभागातल्या पाणीपुरवठ्यामध्ये कपात करण्यात येणार आहे.

उद्या गुरूवारी सकाळी ८ ते सकाळी १० वाजेपर्यंत या २ तासांच्या कालावधीत तज्ज्ञ समिती जलाशयाची अंतर्गत पाहणी करणार आहे. त्यासाठी कप्पा रिक्त केल्याने, मुंबई शहरातील पुढील भागातल्या पाणीपुरवठ्यावर विपरीत परिणाम होणार आहे.

‘ए’ विभाग- कफ परेड व आंबेडकर नगर – (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी ११.२० ते दुपारी १.४५ वाजेपर्यंत)- याठिकाणी १०० टक्के पाणीपुरवठा बंद राहील.

नरिमन पॉईट व जी. डी. सोमाणी– (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी १.४५ ते ३ वाजेपर्यंत) – पाणीपुरवठ्यात ५० टक्के कपात करण्यात येईल.

मिलीट्री झोन- (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – २४ तास) – पाणीपुरवठ्यात ३० टक्के कपात करण्यात येईल.

मलबार हिल व आझाद मैदान जलाशयातून पाणी पुरवठा होणारे ‘ए’ विभागातील सर्व क्षेत्र (उपरोक्त विभाग वगळून) – पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात येईल.

सी विभाग- मलबार हिल व आझाद मैदान जलाशयातून पाणीपुरवठा होणारे ‘सी’ विभागातील सर्व क्षेत्र – पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात येईल.

डी विभाग- पेडर रोड- (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – दुपारी १ ते रात्री १०.३० वाजेपर्यंत) – पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात करण्यात येईल.

मलबार हिल व आझाद मैदान जलाशयातून पाणीपुरवठा होणारे ‘डी’ विभागातील सर्व क्षेत्र (उपरोक्त विभाग वगळून) पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात येईल.

जी उत्तर व जी दक्षिण विभाग- जी उत्तर व जी दक्षिण विभागातील थेट पाणीपुरवठा होणारे सर्व विभाग – पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात येईल.

उद्या वर नमूद केल्याप्रमाणे पाणीपुरवठा होईल. तसेच काही ठिकाणी पाण्याचा दाब कमी राहील. या पाणीकपातीदरम्यान जलाशयातील पातळी लक्षात घेऊन आवश्यकता भासल्यास विभागवार पाण्याच्या वेळेत बदल करण्यात येईल. या कालावधीत पाण्‍याचा जपून वापर करावा आणि पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content