Homeकल्चर +आता दर शुक्रवारी...

आता दर शुक्रवारी पाहा ‘कॅफे कॉमेडी’!

कलाक्षेत्र आणि अविरत संघर्ष यांची युगानुयुगे सांगड रचली गेली आहे. कलेची साधना करत संघर्षातून आपलं नवं विश्व उभारण्याचं स्वप्न प्रत्येक कलाकार पाहत असतो. ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटी अशाच स्वप्नाळू कलाकारांसाठी ‘कॅफे कॉमेडी’ या विनोदी कार्यक्रमांतर्गत झकास संधी घेऊन येत आहे. प्रत्येक शुक्रवारी हा कार्यक्रम होणार असून कार्यक्रमाचा पहिला भाग ८ डिसेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.

‘अल्ट्रा झकास’ हा आपल्या रसिक प्रेक्षकांसाठी भन्नाट ‘स्टँड अप कॉमेडी’ कार्यक्रम आणणारा पहिला मराठी ओटीटी आहे. महाराष्ट्रात दर बारा मैलावर मराठी भाषा एक वळण घेते. खांदेशी, वऱ्हाडी, मालवणी, कोल्हापुरी, सोलापुरी, बाणकोटी किंवा मराठवाड्याचा वेगळा बाज. अशाच वेगवेगळ्या भागातून वेगवेगळे कौशल्यवान कलाकार या कार्यक्रमात विनोद सादर करून प्रेक्षकांचं झकास मनोरंजन करणार आहेत.

सुप्रसिद्ध टीव्ही मालिकांचे लेखक आणि निर्माते आशिष पाथरे ‘कॅफे कॉमेडी’ कार्यक्रमाची निर्मिती करत असून अमोल जाधव दिग्दर्शन करत आहेत. कार्यक्रमात उत्साही भर म्हणून एक सुंदर तरुणी कार्यक्रमाच्या आकर्षक सूत्रसंचलनाने प्रेक्षकांवर भुरळ पाडणार आहे. कार्यक्रमाच्या प्रत्येक भागात स्पर्धेतून निवडलेल्या तीन कलाकारांचा एक संच असेल. हे नवोदित कलाकार प्रेक्षकांसमोर आपापल्या भागातील अस्सल विनोदाचा तडका सादर करतील.

‘कॅफे कॉमेडी’ कार्यक्रमाच्या माध्यमातून गर्दी, वर्दळ असणाऱ्या, गजबजलेल्या शहरांपासून शांतता आणि सुख नांदवणाऱ्या आपुलकीच्या गाव खेड्यांपर्यंत पसरलेल्या भिन्न वर्गातील भिन्न कुटुंबातील व्यक्तींना खळखळून आणि पोटभरून हसवण्याचे आमचे प्रामाणिक उद्दिष्ट आहे. हा उद्दिष्ट नक्कीच साकार होईल अशी आशा आहे, असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेंमेंट प्रा. लि.चे सी.ई.ओ. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

नवनवीन चित्रपट, सिरिज आणि शोज पाहण्यासाठी-

https://www.ultrajhakaas.com/marathi-shows

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content