Homeबॅक पेजअभिनेते पंकज त्रिपाठी...

अभिनेते पंकज त्रिपाठी ‘कस्तुरी कॉटन’चे प्रसारदूत!

केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाने नुकतीच कस्तुरी कॉटन भारत उपक्रमाची घोषणा केली. भारतीय कॉटनसाठी नवीन मानकांनुसार एक व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा उपक्रम आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते पंकज त्रिपाठी हे या कस्तुरी कॉटन उपक्रमाचे प्रसारदूत म्हणून लाखों लोकांसमोर हा उपक्रम पोहोचवणार आहेत. त्यामुळे भारतीय कापूस उद्योगात आमूलाग्र परिवर्तन होऊ शकेल.

उच्च दर्जाच्या ग्वाहीबरोबरच शेतकऱ्यांसह मूल्य साखळीतील प्रत्येकाच्या जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी हा उपक्रम प्रयत्नशील असून त्यामुळे अधिक चांगले फायदे तर मिळतीलच शिवाय जागतिक पातळीवर भारतीय कापूस उद्योगाची एक ओळख निर्माण होईल. कस्तुरी कॉटन हे फक्त उत्पादन नाही तर शेती ते सूत, ते कारखान्यात नेल्यावर त्यातून फॅशनचे दर्जेदार कपडे तयार करून ते परदेशात निर्यात करणे या 5 F तत्त्वांप्रती असलेल्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. त्यामुळे भारतीय कापूस उद्योगाला जागतिक दर्जा गाठण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. जागतिक मानके आणि कापूस उत्पादनात शाश्वततेलाही त्यामुळे चालना मिळेल.

त्याचबरोबर त्रिपाठी यांच्या सहभागामुळे हा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय उपक्रम एका नव्या उंचीवर जाऊन पोहोचेल. केंद्र सरकारचे वस्त्रोद्योग मंत्रालय, भारतीय कापूस महामंडळ आणि टेक्सप्रोसिल यांच्या सहकार्यातून सुरू झालेल्या या उपक्रमाला त्रिपाठी यांच्या सहभागामुळे मदत होणार आहे.

शेतकरी पार्श्वभूमीत वाढलेल्या माझ्यासारख्या माणसाचा या उपक्रमाला पूर्ण पाठिंबा आहे. या उपक्रमामुळे कपास लागवडीतून अधिक उत्पन्न मिळेल. त्यामुळे या उद्योगातले शेतकरी आणि इतरांच्या आयुष्यात परिवर्तन घडेल. तसेच जगाला हवे असलेले अधिक चांगल्या दर्जाचे उत्पादन या उपक्रमामुळे झाले तर ती आपल्या देशासाठी अभिमानाची बाब ठरेल, अशा भावना त्रिपाठी यांनी व्यक्त केल्या.
सविस्तर तपशील आणि माहिती कस्तुरी कॉटनच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भागीदारांबद्दल:
टेक्सप्रोसिल: 1954मध्ये स्थापना झालेली आणि वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी ही सर्वोच्च संस्था आहे. जागतिक स्तरावर 150पेक्षा जास्त देशांना सेवा देणार्‍या भारतीय कापूस कापड उत्पादनांच्या निर्यातीचे नेतृत्त्व केले.
सीसीआय: सीसीआय ही 1970 मध्ये स्थापन झालेली एक मिनी रत्न कंपनी आहे. वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या प्रशासकीय मार्गदर्शनाखाली कापूस उत्पादक शेतकरी आणि वस्त्रोद्योगाला मदत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content