Homeबॅक पेजसमुद्रमार्गे भारतातील केळीची...

समुद्रमार्गे भारतातील केळीची पहिली खेप युरोपला रवाना!

भारतातून युरोपला पहिल्यांदाच सागरी मार्गाने केळ्यांची निर्यात केली जात असून प्रायोगिक तत्त्वावर या खेपेच्या निर्यातीनिमित्त कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्य उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने (अपेडा) महाराष्ट्रात पुण्याजवळ नुकतेच एका कार्यक्रमाचे आयोजन केले. भारतीय केळ्यांना युरोपच्या बाजारपेठेत आणखी जास्त वाव मिळावा या उद्देशाने या अतिशय महत्त्वाच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाद्वारे समुद्रमार्गे केळीची भारतातील पहिली खेप युरोपला रवाना करण्यात आली.

अपेडाचे अध्यक्ष अभिषेक देव, आयएएस या कार्यक्रमाला उपस्थित होते. महाराष्ट्रातून युरोपला केळ्यांची मोठ्या प्रमाणात निर्यात करण्याच्या क्षमतेचे दर्शन घडवणारा हा कार्यक्रम म्हणजे भारतीय कृषी निर्यात क्षेत्रात पुढचे पाऊल टाकणारा संस्मरणीय क्षण ठरला. एकूण 19.50 मेट्रिक टन केळी (1080X18.14 प्रति खोका निव्वळ भार) अपेडाकडे नोंदणीकृत असलेल्या मेसर्स, आयएनआय फार्म्स प्रा. लि. या महाराष्ट्रातील निर्यातदाराकडून निर्यात करण्यात आली. महाराष्ट्रात मेसर्स, आयएनआय फार्म्स प्रा. लि., वासुंदे, बारामती- कुरकुंभ रोड, दौंड, पुणे येथे या निर्यातदाराच्या पॅकहाऊसमधून ही केळी मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आली. मुंबईत जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाच्या माध्यमातून सागरी मार्गाने या केळ्यांची निर्यात केली जाईल. ही निर्यात प्रक्रिया सुरू करण्यासाठी अतिशय सुनियोजित पद्धतीने अपेडाकडून, महाराष्ट्रातील मेसर्स, आयएनआय फार्म्स प्रा. लि. या निर्यातदार कंपनीला संपूर्ण पाठबळ देण्यात आले. भारताच्या केळी निर्यातीच्या क्षेत्रात यामुळे एका नव्या अध्यायाची सुरूवात झाली.

यावेळी अपेडाच्या दिल्लीतील मुख्यालयाच्या फ्रेश फ्रूट्स अँड व्हेजिटेबल डिव्हिजनच्या (FFV Division) महाव्यवस्थापक विनिता सुधांशू, मुंबईमधील प्रादेशिक कार्यालयाचे प्रमुख आणि उपमहाव्यवस्थापक नागपाल लोहकरे, राज्य सरकारचे इतर वरिष्ठ अधिकारी, केळी निर्यातदार, प्रगतीशील केळी उत्पादक शेतकरी आणि आयएनआय फार्म्सचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

भारतीय कृषी उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये वाव देण्यासाठी अपेडाची वचनबद्धता या ऐतिहासिक कार्यक्रमातून अधोरेखित झाली. अशा प्रकारे युरोपला प्रायोगिक तत्वावर केळी पाठवण्याचा हा प्रयत्न निर्यात क्षेत्रामधील एक महत्त्वाचा प्रयत्न आहे. ही उद्दिष्टे साध्य करण्याच्या प्रयत्नांना आणखी चालना देण्यासाठी आणि युरोपीय बाजारपेठेतील भारताचे स्थान बळकट करण्यासाठी अपेडा अतिशय सक्रीय पद्धतीने हितधारकांसोबत काम करत आहे. 

Continue reading

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...
Skip to content