Homeएनसर्कलजम्मू-काश्मीरमधील रामबन पुलाचे...

जम्मू-काश्मीरमधील रामबन पुलाचे काम पूर्ण!

जम्मू-काश्मीरमधील रामबन पुलाचे बांधकाम यशस्वीरित्या पूर्ण झाले असून 1.08 किलोमीटर लांबीच्या चौपदरी मार्गाची पूर्णता ही लक्षणीय कामगिरी असल्याचे, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. समाजमाध्यमांवरील संदेश मालिकेत त्यांनी ही माहिती दिली. या प्रकल्पासाठी 328 कोटी रुपये खर्च आला असून तो राष्ट्रीय महामार्ग-44च्या उधमपूर-रामबन विभागात आहे.

या असामान्य उड्डाणपूलात कॉंक्रीट आणि पोलाद यांच्या तुळई अर्थात गर्डर्सचा वापर केला आहे. हा पूल पूर्ण झाल्याने रामबन बाजार भागातली वाहतूककोंडी लक्षणीयरित्या कमी होईल तसेच वाहनांच्या वाहतुकीचा प्रवाह सहज सुलभ होईल असे ते म्हणाले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्रष्ट्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली, आम्ही जम्मू आणि काश्मीरला एक उत्कृष्ट महामार्ग पायाभूत सुविधा देण्यासाठी समर्पित आहोत असे गडकरी म्हणाले. ऐतिहासिक कामगिरी केवळ प्रादेशिक आर्थिक समृद्धीलाच चालना देत नाही तर दर्जेदार पर्यटनाचे नंदनवन म्हणूनही त्याचे आकर्षण वाढवते, असेही त्यांनी सांगितले.

Continue reading

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...

रविवारी आनंद घ्या रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, १२ जुलैला सायंकाळी पाच वाजता पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना इशान घोष...
Skip to content