Homeमुंबई स्पेशलउद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही...

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही दसऱ्याचा टीझर जारी!

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि त्याचे चिन्ह शिवसेनेच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्यानंतर पूर्वीच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला आजतागायत अधिकृतरित्या नाव तसेच चिन्ह मिळालेले नाही. तात्पुरती सोय म्हणून त्यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असे नाव देण्यात आले होते. आणि मशाल हे चिन्ह. परंतु आजही उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून आपलाच पक्ष खरी शिवसेना असल्याचा दावा करत आहे जो आजही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

आझाद मैदानात आपल्या पक्षाचा दसरा मेळावा घेण्याची घोषणा केल्यानंतर शिवसेनेचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वीच मेळाव्याचा टीझर जारी केला होता. त्याला प्रत्त्युत्तर देताना शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्या गटाकडूनही त्यांच्या वतीने शिवाजीपार्कवर घेण्यात येणाऱ्या दसरा मेळाव्याचा टीझर जारी करण्यात आला आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content