Homeमुंबई स्पेशलशिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा...

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा टीझर जारी!

जेव्हापासून शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले त्यानंतर होणारा शिवसेनेचा हा दुसरा दसरा मेळावा आहे. मागच्या वर्षी पहिला दसरा मेळावा शिवाजीपार्कवर घेण्यासाठी शिवसेनेचे प्रमुख, मुख्यमंत्री एकनाथ यांनी जोरदार प्रयत्न केले होते. परंतु मुंबई उच्च न्यायालयाने शिवाजीपार्कवर उद्धव ठाकरे यांना दसरा मेळावा घेण्याची अनुमती दिली. त्यानंतर शिंदे यांनी बीकेसी मैदानावर अभूतपूर्व असा दसरा मेळावा घेतला.

यंदाही शिवसेनेकडून तसेच उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून दसरा मेळाव्यासाठी शिवाजीपार्क मैदानालाच पहिली पसंती देण्यात आली. मुंबई महापालिका यावर निर्णय घेणार होती. पण त्याआधीच शिवसेनेच्या नेत्यांनी शिवाजीपार्कचा हट्ट सोडण्याचा निर्णय घेतला आणि आपला दसरा मेळावा आझाद मैदानावर घेण्याची घोषणा केली. आज या दसरा मेळाव्याचा टीझरही त्यांनी प्रसिद्ध केला.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content